
तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांच्या विधानसभेतील वार्षिक अभिभाषणावर द्रमुकने बहिष्कार टाकला असून द्रमुकने चिकटवलेल्या पोस्टरवर रवी बाहेर जा च्या घोषणा देण्यात आल्या होत्या .
यासंदर्भात भाजप आ. वनाथी श्रीनिवासन यांनी द्रमुकच्या या कृतीचा निषेध करत जोरदार टीका केली. त्यांनी द्रमुकने राज्यपाल आर.एन. रवी यांच्या विरोधात पोस्टर चिकटवले आहे, द्रमुकने राज्यपालांची अनेक वेळा खिल्ली उडवली असून त्हीयांची ही पहिलीच वेळ नाही, ही द्रमुक पक्षाची जुनी सवय आहे. राज्यपाल जेव्हा जेव्हा विधानसभेत येतात तेव्हा ते तामिळचा अनादर करत असल्याचे नाटक द्रमुक पक्षाचे नेते करतात शिवाय काल राज्यपालांनी राष्ट्रगीत वाजलेच पाहिजे असा आग्रही धरला असल्याचेही त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगाल किंवा केरळसारख्या त्यांच्या मित्रपक्षाच्या राज्यांसह इतर सर्व राज्यांमध्ये, राज्यपाल जेव्हा येतात तेव्हा राष्ट्रगीत गायले जाते. द्रमुकला वाटते की तामिळनाडूची राज्यात वेगळी प्रक्रिया आहे.



