Memory

स्वराज्य ही केवळ राज्यव्यवस्था नव्हे, ती आत्मसन्मानाची क्रांती होती


💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
शिवरायांनी शिकवले — ध्येय पवित्र असेल,
तर मार्ग स्वतः निर्माण होतो.
तलवारीपेक्षा तीक्ष्ण होते त्यांचे विचार,
आणि किल्ल्यांपेक्षा भक्कम होते त्यांचे धैर्य.
संकटे कितीही प्रचंड असली तरी श्रद्धाआणि
शौर्य जिवंत असेल, तर विजय अटळ असतो.
शिवजयंती म्हणजे पराक्रमाची केवळ आठवण नव्हे,
तर स्वाभिमानाचा नूतन संकल्प आहे.
जिथे धर्म, धैर्य आणि दया यांचा संगम होतो,
तिथेच शिवविचारांचा उदय होतो.
अन्यायासमोर न झुकणे आणि दुर्बलांचे रक्षण करणे —
हाच खरा शिवमार्ग.
शिवरायांचा इतिहास वाचण्यासाठी नसतो;
तो आचरणात आणण्यासाठी असतो.
शिवजयंतीच्या पावन दिनानिमित्त आपणांस,
आपल्या आप्तस्वकीयांना व परिवारास
खूप खूप शुभेच्छा. 🙏💐💐🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/