सेप्सिसचा थरार हातपाय गमावले आणि स्थिती गंभीर

हे वाचून खरोखरच धक्का बसेल, इंग्लडमध्ये राहणाऱ्या मनजीत संघा यांची ही कहाणी अत्यंत दुर्दैवी अशी आहे. सेप्सिस (Sepsis) सारख्या गंभीर आजाराबद्दल आपण आपल्या घरातील पाळीव प्राण्याच्या बाबात किती जागरूक राहणे किती गरजेचे आहे, हे यावरून स्पष्ट होते. घरातील पाळीव कुत्र्याच्या चाटण्याने त्यांच्यावर हातपाय तोडण्याइतकी भयानक परिस्थिती ओढवेल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल.
युनायटेड किंग्डममधील ५२ वर्षीय मनजीत संघा या महिलेला गंभीर सेप्सिस झाल्यानंतर तिचे दोन्ही हात आणि पाय कापण्यात आले. हा संसर्ग तिच्या पाळीव कुत्र्याने हातपायांना चाटल्यानंतर संघा यांच्या हात किंवा पायावर असणाऱ्या लहान जखमेतून हा संसर्ग तिच्या रक्तप्रवाहात गेला असे मानले जात आहे.
जुलै २०२५ मध्ये मनजीत संघा आजारी पडल्या होत्या कामावरून घरी परतताना अस्वस्थ वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे ओठ जांभळे पडले होते आणि हातपाय थंड पडून त्या बेशुद्ध पडल्या होत्या.
या आजारातून बरे करण्यासाठी डॉक्टरांनी व जीव वाचवण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आल्या.संघा यांना वुल्व्हरहॅम्प्टन येथील न्यू क्रॉस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सतत ३२ आठवडे रुग्णालयात राहावे लागले या दरम्यान, तिला सहा वेळा हृदयविकाराचा झटका आला होता.
शरीरातील संसर्ग आणखी पसरू नये म्हणून डॉक्टरांनी गुडघ्याखालील दोन्ही पाय आणि दोन्ही हात कापले. याबरोबरच अनेक शस्त्रक्रिया त्यांच्यावर केल्या. अखेर जीव वाचवण्यासाठी प्लीहा देखील काढून टाकण्यात आली. संघा यांना झाालेला संसर्ग हा कॅप्नोसाइटोफॅगा कॅनिमोरसस असून तो सामान्यतः कुत्र्यांमध्ये आढळतो मात्र तो कुत्र्यासाठीनिरुपद्रवी असतो परंतु जर तो मानवी रक्तात गेला तर तो मानवांसाठी घातक ठरू शकतो.
सेप्सिस म्हणजे काय, आणि ते कसे प्राणघातक ठरू शकते?
सेप्सिस ही एक जीवघेणी स्थिती आहे जिथे संसर्गाप्रती शरीराची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया स्वतःच्या ऊतींना आणि अवयवांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे मानवाचे अवयव निकामी होतात.ते सेप्टिक शॉकमध्ये प्रगती करू शकते, ज्यामुळे धोकादायकपणे कमी रक्तदाब आणि मल्टी ऑर्गन फेलीअर होण्याची शक्यता असते. सेप्सिसच्या संसर्गाचा धोका सामान्यपणे न्यूमोनिया, मूत्रमार्गाचे संक्रमण, पोटाचे संक्रमण, रक्तप्रवाहाचे संक्रमण आणि संक्रमित जखमा किंवा भाजणे यांच्यावर अधिक असतो..
सेप्सिस होण्याचा धोका कोणाला आहे?
कोणालाही सेप्सिस होऊ शकतो, परंतु ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये, गर्भवती महिलांमध्ये, मधुमेह असलेल्या किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये आणि नवजात मुलांमध्ये हा धोका जास्त असतो.
सेप्सिसच्या लक्षणांमध्ये गोंधळ किंवा मानसिक स्थितीत अचानक बदल, जलद श्वास घेणे, कमी रक्तदाब, खूप कमी अधिक ताप यांचा समावेश असतो.
सेप्टिक शॉकच्या प्रकरणांमध्ये, एखाद्या व्यक्तीला जागे राहणे किंवा उभे राहणे कठीण होऊ शकते.
कुत्र्याचे चाटणे प्राणघातक का ठरू शकते? बहुतेक कुत्र्यांच्या लाळेमध्ये कॅप्नोसाइटोफॅगा नावाचे जीवाणू नैसर्गिकरित्या असतात. ते कुत्र्यांसाठी हानिकारक नसतात, पण जर मानवी शरीरात ते ‘ओपन कट’ किंवा ‘जखमे’द्वारे शिरले, तर ते अत्यंत घातक ठरू शकतात.
सेप्सिस म्हणजे काय? जेव्हा शरीरातील संसर्गाशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती अतिशय तीव्र प्रतिसाद देते, तेव्हा ती स्वतःच्याच पेशी आणि अवयवांना इजा पोहचवू लागते. यालाच सेप्सिस म्हणतात. याची पुढची पायरी म्हणजे ‘सेप्टिक शॉप’, ज्यात रक्तदाब अत्यंत कमी होतो आणि अवयव निकामी होतात.
सेप्सिसची धोक्याची चिन्हे (Sepsis Warning Signs)
जर तुम्हाला पाळीव प्राण्याने चावा घेतला असेल किंवा जखमेवर चाटले असेल आणि खालील लक्षणे दिसली, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा:
गोंधळलेली अवस्था (Confusion) किंवा शुद्ध हरपणे.
अतिशय थंडी वाजणे किंवा स्नायूंमध्ये तीव्र वेदना.
लघवी कमी होणे.
त्वचेचा रंग बदलणे किंवा त्वचा फिकट पडणे.
श्वास घेण्यास त्रास होणे.


