Uncategorized

राजर्षी शाहू महाविद्यालयाचे नीट-युजी-2025 परीक्षेत अभूतपूर्व यश

लातूर नीट-युजी-2025 परीक्षेचा निकाल आज शनिवार दि. 14 जून, 2025 रोजी दुपारी 01-00 वा. जाहीर झाला. यामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महाविद्यालयाच्या 16 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.

दर्शन महादेव मुळे या विद्यार्थ्याने (651 गुण) ऑल इंडिया रँक 73 वा व इतर मागासवर्गीय (ओबीसी) संवर्गातून 19 वा रँक प्राप्त केला आणि महाविद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. देवराज अमोल पाटील (640 गुण) ऑल इंडिया रँक 131 व ईडब्ल्यूएस संवर्गातून देशात 7 वा रँक प्राप्त करून महाविद्यालयातून सर्वद्वितीय आला. श्रेयश अजित पोकळे (624 गुण) ऑल इंडिया रँक 357 महाविद्यालयातून सर्वतृतीय आला आहे. अनुराग बाबासाहेब मोरे (608 गुण) अनुसूचित जाती संवर्गातून 23 वा (ऑल इंडिया रँक 971) प्राप्त करून प्रथम आला आहे तर सार्थक सुरेश पवार (544 गुण) अनुसूचित जमाती संवर्गातून देशात 89 रँक मिळवून महाविद्यालयात प्रथम आला आहे. श्रावणी कल्याण गिरवलकर (597 गुण) ऑल इंडिया रँक 1582 मिळवून मुलीत सर्वप्रथम आली.
महाविद्यालयात नीट-युजी परीक्षेच्या पुर्नतयारीसाठी इन्स्पायर (रिपीटर) बॅचचे विशेष वर्ग दरवर्षी चालविले जातात. अवधूत धनाजी माने (599 गुण) ऑल इंडिया रँक 1473 प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम आला आहे.
महाविद्यालयातील 600 पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे महाविद्यालयाचे इतर विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. रामकृष्ण मारोतीराव बिरादार 619 (ऑल इंडिया रँक 488), पुष्कर आनंद राजमाने 617 (ऑल इंडिया रँक 556), अगस्त प्रताप घनशेट्टी 615 (ऑल इंडिया रँक 597), शिवानंद विष्णु तिडके 615 (ऑल इंडिया रँक 616/OBC-165), ओकांर नाना कावडे 607 (ऑल इंडिया रँक 971/EWS-53) श्रीयश शंकर मोरे 606 (ऑल इंडिया रँक 1021/EWS-59), अजिंक्य शरद मुसने 606 (ऑल इंडिया रँक 1002/OBC-300), ओम हनुमंत घनवट 606 (ऑल इंडिया रँक 1013), मुफ्फजल अब्रार पठाण 602 (ऑल इंडिया रँक 1236), आर्यन आनंद मोरे 601 (ऑल इंडिया रँक 1275/OBC-393)
देशातील प्रख्यात अशा AIIMS महाविद्यालयात किमान 50 विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळू शकतो. त्यापैकी AIIMS-Delhi या वैद्यकीय महाविद्यालयात 02 ते 03 विद्यार्थ्यांना तसेच AIIMS-Bhopal येथे किमान 15 विद्यार्थी प्रवेशित होतील तर AIIMS-Nagpur या महाविद्यालयात 12 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरूद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, मुख्य-समन्वयक प्रा. स्वप्निल राजेमाने व एम्स् बॅचचे समन्वयक प्रा. विनोद झरीटाकळीकर, इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/