लातूर जिल्हा

प्राचार्य डॉ. ई. यु. मासुमदार यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ

हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी, औसा संचलित आझाद महाविद्यालय औसा चे प्राचार्य डॉ. ई. यु. मासुमदार यांच्या सेवापुर्ती निमित्त आज गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी औसा चे सचिव मा. डॉ. अफसरजी शेख हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून मा. प्राचार्य निजाम शेख, अजीम कनिष्ठ महाविद्यालय,औसा,मा. प्रा.संजय कुलकर्णी, अध्यक्ष हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी, औसा, तर मा. गजाला असलम अरब सहसचिव हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी, औसा, मा. सुलेमान अफसर शेख लातूर जिल्हाअध्यक्ष रा.वि.का. यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदर कार्यक्रम आज दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी एन. बी. एस. फार्मसी सेमिनार हाॅल, औसा येथे दुपारी 2 वाजता संपन्न होणार आहे. तरी शिक्षण क्षेत्रातील आणि डॉ ई यु मासूमदार यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/