महाराष्ट्र

मराठवाड्यातील व्यावसायिक नाटकाचा ‘सूर्योदय’, “उन्हातलं चांदणं”

लातूरच्या सांस्कृतिक परंपरेला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी उन्हातलं चांदणं या व्यावसायिक कौटुंबिक नाटकाचा सूर्योदय होत आहे. त्यासाठी लातूरकरांनी लातूरकरांच्या पहिल्याच व्यावसायिक नाट्यप्रयोगाला भरभरून प्रतिसाद देऊन नाट्यक्षेत्रातील लातूर पॅटर्न निर्माण केला पाहिजे.

लातूर नगरी सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. लातूरमध्ये हौशी कलाकारांनी आजपर्यंत रंगभूमीच्या माध्यमातून असंख्य नाटके लातुरकर रसिकांना दाखवली. आता लातूरकर कलाकार प्रथमच लातूरकरांसमोर व्यावसायिक नाटक सूर्योदयाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. उन्हातलं चांदणं याच्याशी संबंधित सर्वच कलाकार, निर्माते, दिग्दर्शक हे लातूरचे असून आपल्याच भूमीत ते या माध्यमातून यशोशिखर गाठण्यासाठी पहिली पायरी टाकत आहेत.
यशस्वी लेखक शैलेश गोजमगुंडे लिखित उन्हातलं चांदणं सर्वांगानी आपल्याला खिळवून ठेवेल. असे हे उन्हातलं चांदणं मराठवाड्यातील पहिलेच व्यावसायिक नाटक आहे म्हणून हा ऐतिहासिक क्षण लातूरकरांना सुवर्णक्षण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. नाटकात प्रा. नवलाची जाधव, डॉ स्वप्नाच्या यादव, ज्ञानेश्वरी कवडे, अभिषेक शिंदे, शैलेश गोजमगुंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कॉमेडी, सस्पेन्स आणि थ्रीध या तिन्हीचा सुयोग्य संगम या नाटकात पाहायला मिळेल. परिपक्व कथानक, दमदार अभिनय, सुमधुर संगीत, उत्कंठा वाढवणारे प्रसंग, एका उंच शिखरावर नेऊन वेगळ्याच वळणावर घेऊन जाणारे हे नाटक लातूरकर नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरेलच परंतु ते महाराष्ट्रातील रसिकांच्या पसंतीस उतरेल हा सूर्योदयाचा आत्मविश्वास आपल्याला 12 एप्रिल रोजी सायंकाळी दगडोजीराव देशमुख सभागृह, लातूर मध्ये पाहायला मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/