Uncategorized

सुसंस्कृत राजकीय युगाचा अंत

देशाचे माजी गृहमंत्री आणि पंजाब चे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज सकाळी 6.00 वाजता निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने एका सुसंस्कृत राजकीय युगाचा अंत झाला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या समवेत

शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी लातूर जिल्हात नव्हे तर देशातील राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी छाप फाडली होती. विरोधकांना देखिल सन्मान दिला पाहिजे त्यांच्या मतांचा आदर केला पाहिजे ही तत्वे त्यांनी आयुष्यभर पाळली. त्याच्या निधनाने समाज, राजकारणातील स्फटिकी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला 1966 पासून प्रारंभ केला होता. नगराध्यक्ष ते देशाच्या गृहमंत्री लोकसभेच्या सभापती पदापर्यंतचा प्रवास करताना कधीही त्यांच्यावर राजकीय हेतूने किंवा इतर कोणत्याही प्रकारचे आरोप झाले नाहीत.राजकीय निष्कलंक पध्दतीने जगणारे पाटील साहेबांनी श्रीमती इंदिरा गांधी फी व्ही नरसिंहराव यांच्या काळात आणि त्यानंतरही त्यांनी देशाला अभिमान वाटावा याच पध्दतीने कार्य केले आहे.
त्यांचा जन्म चाकूर येथील. त्यांचे वडील वतनदार पाटील होते. त्यांचे शिक्षण हैदराबाद मधील निजाम काॅलेज आणि आगरवाल नाईट काॅलेज मध्ये बी एसस्सी पर्यंत नंतर एल एल बी आणि एल एल एम ची पदवी मुंबईतून प्राप्त केली होती.
औरंगाबाद येथील मानिकचंद पहाडे काॅलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम करताना लातूर येथेच वकिली व्यवसाय करणे पसंत केले.

याच दरम्यान त्याच्या कार्यावर प्रभावित होऊन लातूर मधील राजकीय वर्चस्व राखणारे श्री केशवराव सोनवणे व माणिकराव सोनवणे यांनी त्यांना राजकारणात ओढले येथेच त्यांच्या राजकीय कारकीर्द सुरू झाली. नंतर लातूरच्या नगराध्यक्ष पदापासून चा राजकीय प्रवास शेवटी राज्यपाल पदापर्यंत सुरू राहीला.
त्यांनी अनेक पदे भूषविली पण कोणत्याही परिस्थितीत आपण कुठे, काय, केव्हा बोलावे किवा बोलू नये याचे चांगले भान होते. म्हणून त्यांनी कोणत्याही पदावर काम करताना तोल ढळू दिला नाही. त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कॉन्ग्रेस पक्षाचे ते शेवट पर्यंत एकनिष्ठ राहिले. कॉंग्रेस पक्षात अडचणी येत असत तेव्हा त्यांच्याशी खास सल्लामसलत केली जात. ते कोणत्याही गटातटाचे नव्हते.
त्यांची श्रध्दा कामावर होती, निष्ठा देशसेवा होती, दैवत काँग्रेस पक्ष होता, संयम आचार विचारावर होता, आदर सामान्यांचा होता, विनयशीलता वर्तनात होती, भाषा सौम्य होती, नकार जातीवादाला होता, गटबाजीपासून दूर होते, ते निष्कलंक जगले आणि राजकीय कटकारणस्थानात कधी त्यांचा सहभाग नव्हता . तरी देखिल त्यांना निवडणूकीत पराभूत करण्याची खेळी स्वपक्षातीलच लोकांनी केली होती.
त्यांच्या जाण्याने राजकारणातील दिपस्तंभ, प्रगल्भ विचारधारा खंडित झाल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. शेवटी तहेजीब और तम्मदुन का दुसरा नाम शिवराज पाटील चाकूरकर असेच म्हणावे लागेल.
आपणास विनम्र आदरांजली. 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/