देवघरातील देव गेला : सामान्यांची भावना

नगरसेवक,नगराध्यक्ष,आमदार,मंत्री,देशाचे गृहमंत्री,लोकसभा अध्यक्ष,राज्यपाल आणि अनेक पावर विराजमान झालेल्या शिवराजजी पाटील चाकूरकर यांचे आज दु:खद निधन झाले. त्याच्या जाण्याने समाजाचे,देशाचे आणि विशेषत: सुसंस्कृत राजकारणाचे मोठी हाणी झाली आहे. त्यांच्या निघनानंतर आज सकाळपासूनच देवघरवर अंत्यदर्शनासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्याबरोबरच कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत असून त्यांच्या मनात देवघरातील देव गेल्याची भावना निर्माण होत आहे.
राज्यातीलच नव्हे तर देशभरातील अनेकांनी त्यांच्या जाण्याचे दु:ख झाल्याची भावना शोकसंदेशाद्वारे व्यक्त केली असून अंत्य दर्शनासाठी अनेक नेते मंडळी येण्याची शक्यता आहे.आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी अंत्यदर्शनासाठी देवघरला भेट देणार आहेत.
मा शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या जीवनातील क्षणचित्रे




विविध मान्यवरांचे शोक संदेश
पंतप्रधान नंरेद्र मोदी-
श्री शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. पं
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रफडणवीस
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनता, सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि तो राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर सदैव स्मरणात राहतील, त्यांच्या निधनामुळे राजकारण- समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला मुकलो आहोत.
उपमुख्यमंत्री अजित पवार –
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
आमदार, खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, लोकसभेचे माजी सभापती, माजी केंद्रीय गृहमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल अशा विविध भूमिका समर्थपणे सांभाळत आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला प्रतिष्ठा मिळवून देणारे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या दु:खद निधनामुळे राजकारण व समाजकारण यांची सुयोग्य सांगड घालणारा अनुभवी, सुसंस्कृत व सेवाभावी आदर्श काळाच्या पडद्याआड गेला आहे.
त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी 11.00 वाजता लातूर लगतच्या वंरवटी येथे करण्यात येणार आहे.



