
देशभर गाजलेल्या आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवरील बलात्कार व हत्या प्रकरणी कोलकत्याच्या विशेष न्यायालयाने आज आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अनिर्बंन दास यांनी संजय रॉय याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 66 आणि 103 (एक) या कलमाच्या अनुषंगाने दोषी ठरवले. या महाविद्यालयातील 31 वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर ही महाविद्यालयाच्या सेमिनार कक्षात 9 आॅगस्ट 2024 रोजी विश्रांती घेत असताना पहाटेच्या वेळेला संजय रॉय यांनी बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप होता.
या संदर्भात कोलकत्ता पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या चौकशी बद्दल कोलकत्ता उच्च न्यायालयाने असं मतदान व्यक्त करून सदर होण्याचा तपास CBI ने करावा असा निकाल दिला होता. त्यानुसार सीबीआय मार्फत सविस्तर चौकशीअंती त्याच्यावर गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयात नियमित कामकाजाला नोव्हेंबर मध्ये सुरू झालेले ही सुनावणी नऊ जानेवारीला संपली. त्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यानुसार त्याला आज ही शिक्षा सुनावण्यात आली.
देश देशभर गाजलेल्या या खटल्यातील आरोपींला काय शिक्षा होते याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. दोषींवर कारवाई करण्यासाठी कोलकत्ता सह देशभर आंदोलने आणि मोर्चाचे आयोजन कारण्यात आल होत. कोलकाता शहरात अनेक दिवस डॉक्टरांनी काम बंद आंदोलन देखील केले होते.
या प्रकरणात संजय रॉय हा एकटा दोषी नसून त्यासोबत मोठी टोळी असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी आणि सीपीएमच्या नेत्यांनी केला आहे.



