देश -विदेश

स्पेडेक्स मिशन डॉकिंग सक्सेसफुल

वैज्ञानिकांचे राष्ट्रपती, पंतप्रधानांनी केले अभिनंदन

स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट, स्पाडेक्स अंतर्गत प्रक्षेपित केलेल्या दोन उपग्रहांच्या यशस्वी डॉकिंगसह भारताच्या अंतराळ कार्यक्रमाने ऐतिहासिक टप्पा गाठला! अंतराळ डॉकिंग क्षमता प्रदर्शित करणारा भारत हा चौथा देश आहे. या कामगिरीमुळे चांद्रयान-४, भारताचे नियोजित अंतराळ स्थानक आणि गगनयान यासारख्या अवकाश संशोधनातील भारताच्या भविष्यातील प्रयत्नांचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या अंतराळ क्षमता वाढवण्यासाठी इस्रो आणि देशातील संपूर्ण शास्त्रज्ञ आणि अभियंता समुदायाचे राष्ट्रपती द्रौपदी यांनी अभिनंदन केले आहे.
भारताने अवकाशात नवीन किर्तीमान स्थापित केला आहे . इस्रोला स्पेडेक्स मिशनच्या डॉकिंगमध्ये ऐतिहासिक यश प्राप्त झाले आहे . इस्रोने पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत दोन उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केले . अशी कामगिरी करणारा भारत अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश ठरला आहे. हा क्षण भारतीयांना अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशासाठी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपग्रहांच्या अवकाशातील डॉकिंगच्या यशासाठी इस्रोचे वैज्ञानिक आणि सगळ्या अंतरिक्ष संशोधन समुदायाला शुभेच्छा दिल्या. भविष्यातील भारताच्या महत्वकांक्षी अवकाश मोहिमांसाठी हे एक महत्त्वाच पाऊल आहे. 12 जानेवारीला या मिशनची ट्रायल चाचणी पूर्ण झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/