महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाचे पुरस्कार वितरण उद्या

महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ चारकोप मुंबईच्या वतीने दिले जाणारा जीवनगौरव, संस्कृत प्रचारासाठीचे आणि लेखन पुरस्कार सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे वितरित केले जाणार आहेत
या अंतर्गत जीवन गौरव पुरस्कार पद्मश्री प्रभुणे गिरीश पुणे, संस्कृत प्रसार प्रचारासाठीचा पुरस्कार डॉ निवेदिता सराफ संभाजीनगर, लेखक पुरस्कार डॉ गौरी माहोलीकर, काशिनाथ दैवधर, डॉ महेश गायकवाड, श्रीमती यमुना हर्षवर्धन, संजय देसाई व डॉ रंजन गर्गे यांना दिले जाणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक हे उपस्थित राहणार असून मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित असतील. कार्यक्रम शासकीय अध्यापक महाविद्यालय पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 10.30 ते 4.00 दरम्यान संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक डॉ वर्षा लिमये सहकार्यवाह द. ल. पदे संयोजक उल्हास बडोदकर सचिव यांनी केले आहे.



