डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन- समता शांती पदयात्रा

डॉ
.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी (दि.सहा) व्याख्यान, समता शांती पदयात्रा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सदर कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी ८ ते ९ दरम्यान वाय कॉर्नर ते मिलिंद महाविद्यालय दरम्यान समता शांती पदयात्रा काढण्यात आली. यानंतर नाटयगृहात मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी कवी, व्याख्याते, अभ्यासक्रम रवींद्र केसकर यांचे ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दोन सुर्वण पान : माता रमाई आणि आईसाहेब’ या विषयावर व्याख्यान झाले.
कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रविकिरण सावंत, डॉ व्यंकट लांब,कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर व संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.



