महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांच्या प्रभाग रचनेस सुरुवात


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनामार्फत राज्यातील महानगरपालिका ,नगरपरिषदा, नगरपंचायती,आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कालबद्ध कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

या अंतर्गत प्रभाग रचनेसाठी महानगरपालिका अ, ब, क, ड या सर्व वर्गातील आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सुद्धा 11 जून 2025 ते साधारण 4सप्टेंबर 2025 पर्यंत कालबद्ध आणि टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश काल शासनाच्या वतीने सर्व जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत.
या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेसाठी प्रगणक गटांची मांडणी करण्याला 11 जून ते 16 जून 2025 कालावधीत सुरुवात करून प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, जनगणनेची आणि संबंधित इतर कामे पूर्ण केली जाणार आहेत. तर राज्य निवडणूक आयुक्तांना अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यासाठी 29 ऑगस्ट 2025 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान चा कालावधी देण्यात आलेला आहे.
दरम्यानच्या कालखंडात विविध पातळ्यांवर प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सूचना, शिफारशी यांच्यावर कारवाई करण्यासाठीचा कालावधी देण्यात आला आहे. तर अ, ब, व क वर्ग दर्जाच्या महानगरपालिकांच्या प्रभाग रचने करता देखील स्वतंत्र वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले असून यासाठी देखील संबंधित महानगरपालिका आयुक्तांना ठराविक कालावधीमध्ये प्रभाग रचने संदर्भातील ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून 18 ऑगस्ट च्या आत हरकती सुनावणी सूचना शिफारसी या सगळ्यांच्या अंतिम केलेली प्रभाग रचना महापालिका आयुक्तांना कळविणे आणि महापालिका आयुक्ताने राज्य निवडणूक आयुक्तांकडे पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सदर निवडणुका कालबद्ध पद्धतीने आणि ठराविक कालावधीमध्ये पार पाडण्यासाठी या कार्यक्रमात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे देखील शासनाने निर्गमित केलेल्या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/