
आपण ज्येष्ठ साहित्यिक असाल, मागच्या पंधरा वर्षापासून साहित्यात महत्वपूर्ण योगदान देत असाल तर आपल्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे तात्काळ आपली ऑनलाइन नोंदणी करून घ्या.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना दरमहा 5 हजार रुपये मानधन देण्याची योजना जाहीर केली आहे. 16 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 31 जुलै 2025 पर्यंत राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त असावे (दिव्यांगांसाठी 40 वर्षे), कला आणि साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षांचे सातत्यपूर्ण, दर्जेदार योगदान असावे, ज्येष्ठ, विधवा, परित्यक्ता, आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येईल, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा कमी असावे, केवळ कलेवर अवलंबून असलेले किंवा सध्या इतर कोणतेही उत्पन्न नसलेले कलाकार या योजनेसाठी पात्र आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर पेन्शन योजनेत समाविष्ट नसलेले आणि महाराष्ट्राचे रहिवासी असलेले कलाकार पात्र राहतील. या योजनेचा उद्देश कला आणि साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे हा आहे.
योजनेचा उद्देश:
साहित्यिक आणि कलावंतांना आर्थिक मदत करणे.
त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणे.
कला आणि साहित्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मान देणे.
योजनेतील वैशिष्ट्ये:
या योजनेत ३४,६०० पेक्षा जास्त साहित्यिक आणि कलाकार सहभागी आहेत.
या योजनेत सहभागी असलेल्या कलावंतांना दरमहा ५,००० रुपये मानधन दिले जाते.
हे मानधन थेट बँक खात्यात जमा केले जाते.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
या योजनेत सहभागी होण्यासाठी, तुम्हाला https://mahakalasanman.org/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज नोंदवावा लागेल.
अधिक माहितीसाठी, तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
तसेच, सांस्कृतिक कार्य संचालनालयाशी संपर्क साधू शकता.




I like this. This is very useful.
Thank you
आमचा मुळात तोच उद्देश आहे. ज्या गोष्टी इतर ठिकाणी नाहीत मात्र त्या महत्त्वाचे असतात. त्या आपल्या पर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय.
इतरांना या ज्ञान यज्ञात सहभागी करुन घ्या