JEE-ADVANCE-2025 मध्ये राजर्षी शाहूचे यश

राजर्षी शाहू कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील जेईई ऍडव्हान्स आणि बारावी परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐संपादक
जेईई-अडव्हान्स-2025 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स मधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. संस्थेतील पीसीएम ग्रुपचे 190 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. प्राप्त निकालापैकी 40 विद्यार्थ्यांनी (AIR) ऑल इंडिया रँक प्राप्त केला आहे.
आयआयटी, आयआयएसटी, आयआयएससी, आयआययसईआर इ. राष्ट्रीय पातळीवरील महाविद्यालयात प्रवेशासाठी जेईई-अडव्हान्स-2025 ऑनलाईन (सीबीटी) परीक्षा 18 मे, 2025 रोजी दोन सत्रात देशात एकाचवेळी घेण्यात आली.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार या महाविद्यालयातून शिवोहम् प्रतापसिंह शिंदे Common Rank List (CRL) 628 घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. सुशांत सुधाकर होळकर हा (CRL) 1501 व इतर मागास संवर्गातून OBC-NCL-Rank List – 248 घेऊन द्वितीय स्थानी आहे. रोनक निरंजन अग्रवाल (CRL) 1634 घेऊन तृतीय क्रमांकावर आहे व आर्थिक दुर्बल घटकामधून EWS-Rank List – 141 महाविद्यालयातून प्रथम क्रमांकावर आहे. अनुसूचित जमाती संवर्गातून विनय राजू राठोड (CRL) SC-Rank-1090, हे विद्यार्थी संवर्गातून महाविद्यालयात प्रथम आले आहेत.
यावर्षी या महाविद्यालयातून जवळपास 40 विद्यार्थ्यांना भारतातील प्रख्यात आयआयटी व 20 विद्यार्थ्यांना एनआयटी, आयसर व बिटस् या महाविद्यालयामध्ये हमखास प्रवेश मिळू शकतो. आतापर्यंतचा हा निकाल सर्वोत्कृष्ट आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरूद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, मुख्य-समन्वयक प्रा. स्वप्निल राजेमाने व आयआयटी बॅचचे समन्वयक प्रा. अभयसिंह देशमुख,प्रा श्रीहरी तलवारे यांच्या इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.



