महाराष्ट्र

सैन्यदलातील अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड , नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते ०१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत SSB कोर्स क्र. ६२ आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कर्यालय, लातुर येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-६२ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र अ त्यासोबत असलेली परिशिष्टंची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
सदर एस. एस. बी.वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेऊन यावेत. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्श्न बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट (‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्ट्ररने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली ((University Entry Scheme) साठी एस.एस.बी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी : tr*****************@***il.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाट्सप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/