महाराष्ट्र

त्रिवेणीचे आज लातूरमध्ये सादरीकरण

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सावरकर कुटुंबाचे योगदान सर्वज्ञात आहे. मात्र त्या परिवारातील महिलांच्या वेदना पडद्या आड राहील्या.त्या स्त्रियांच्या त्यागाची महती मांडणारा त्रिवेणी हा आज लातूर मध्ये सादर केला जाणार कार्यक्रम आहे.

घरातील पुरुषांना स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात खंबीर असा पाठिंबा देणाऱ्या सावरकर घराण्यातील स्त्रियांनीही जे योगदान दिले आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधु बाबाराव, नारायणराव या तिघांच्या पत्नींचे देश कार्यातील योगदान त्रिवेणी या नाटकातून मांडण्यात आले आहे.छत्रपती संभाजीनगर येथील अनुनाद कलाविष्कार या संस्थेच्या सावरकर घराण्यातील महिलांची धगधगती जीवनगाथा *त्रिवेणी* हे नाटक येत्या २ं० सप्टेंबर शनिवारी रोजी शहरातील दयानंद नाट्यगृहामध्ये सायंकाळी ७ वाजता होणार आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.प्रीति पोहेकर यांनी या नाटकाचे अभ्यासपूर्ण लेखन आणि ओघवते असे निवेदन केले आहे. राजश्री पोहेकर यांनी नाट्य -नृत्य दिग्दर्शन तसेच बाबाराव सावरकर यांच्या पत्नी येसूवहिनींची भूमिका केली आहे.अमिता लेकूरवाळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी माईंची तर आरोही लेकूरवाळे यांनी नारायणरावांच्या पत्नी ताईंची भूमिका साकारली आहे.तेजस महाजन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व साकारले आहे.नृत्य, नाट्य,निवेदनात्मक या नाटकात सावरकरांनी लिहीलेल्या गीतांवर विलोभनीय अशी नृत्य सादर केली जातात.सानिका ओक,पूर्वा लाड,शर्वरी गायकवाड,अंजली कुलकर्णी,ओवी कोल्हटकर,मेघा ,सार्थक सुरडकर, सिध्दार्थ कौसडीकर, इशान महाजन, कमलेश देशपांडे हे कलाकार नृत्य सादर करतात.मराठवाड्यातील २५ कलाकार हे भव्य नाटक सादर करतात ,स्त्रीशक्तिचे दर्शन घडवणारे,देशभक्ती जागृत करणारा हा कार्यक्रम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून जास्तीत जास्त लोकांनी नाटक बघण्याचे आवाहन संस्थेच्या शिवाली गायकवाड यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/