डॉ कुंभार यांना डॉ.यशवंत सुमंत स्मृती जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्राती विचारवंत,विचारशलाका त्रैमासिकाचे संपादक डॉ.नागोराव कुंभार यांना डॉ.यशवंत सुमंत स्मृती जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून, त्याचे वितरण रविवार,दि.1 फेबु्रवारी 2026 रोजी सायंकाळी स.ब.सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय सभागृह, वर्धा येथे होणार आहे.
ज्येष्ठ विचारवंत डॉ.भा.ल.भोळे व डॉ.यशवंत सुमंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि सुमंत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विविध राज्यातील मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते.वर्ष 2025 च्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून,त्यात डॉ.नागेाराव कुंभार यांना डॉ.यशवंत सुमंत स्मृती जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणेच्या दीपक गायकवाड लिखित पेरियार -मिथक आणि वास्तव वैचारिक ग्रंथाला,डॉ.भा.ल.भोळे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदुम यांना डॉ.भा.ल.भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार तसेच अभ्यासक डॉ.देवकुमार अहिरे यांची डॉ.यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधक प्रेरणा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सदरील पुरस्काराचे वितरण सर्च संस्थेचे प्रमुख डॉ.अभय बंग यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार,विदर्भ साहित्य संघाचे व यशवंतराव दाते स्मृती संस्था वर्धाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.



