जगप्रसिद्ध वैज्ञानिकाला वाचा देणारे वैज्ञानिक अज्ञातात

हे दोघे इंजिनिअर्स किती लोकांना माहिती आहेत हे माहित नाही … त्यांची नावे आहेत
“अरुण मेहता आणि विक्रम क्रिष्णा.” यांनी जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचे बोलायचे यंत्र/ सॉफ्टवेअर या दोघांनी भारतातच बनवले होते.
स्टीफन हॉकिंग हे साधी हातापायांची हालचाल पण करू शकत नव्हते, त्यांना ALS आजार होता, बोलता येत नसल्याने “टाईप टू स्पीच” या 90’s च्या टेक्नॉलॉजी वर ते इतरांशी संवाद साधत होते, पण ते टाईप करणे सुद्धा स्टीफन याना तेवढे सोपे नव्हते.
जेव्हा हॉकिंग भारतात आले तेव्हा अरुण मेहता त्यांना भेटले, त्यांच्याशी संवाद साधताना अरुण मेहता यांना स्टीफन हॉकिंग यांचा सेन्स ऑफ ह्युमर, एक विनोदी स्वभाव जाणवला, पण जो टेक्स्ट to स्पीच मधून व्यक्त होणे अवघड होते, आणि हे अरुण मेहता यांनी स्टीफन यांना सांगितले… त्यावर…
“तुम्ही माझ्यासाठी असे काही डेव्हलप करू शकता का?” असे हॉकिंग यांनी अरुण मेहताना विचारले
आणि पुढे अरुण मेहता आणि विक्रम कृष्णा यानी मिळून eLocutor डेव्हलप केले. आता स्टीफन हॉकिंग यांना टाईप करण्यासाठी मेहनत घ्यायची गरज नव्हती, त्यांचे बोलणे लिमिटेड नव्हते तर आता त्यांचे विचार आणि इमोशन्स व्यक्त करणे हे फक्त एका क्लिक वर काम झाले.
eLocutor काय आहे?
eLocutor हे एक सिंगल-बटन टायपिंग आणि स्पीकिंग सॉफ्टवेअर आहे, जे स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे ज्यांना बोलण्यात किंवा टाइप करण्यात अडचण येते.
स्टीफन हॉकिंग यांना ALS (Amyotrophic Lateral Sclerosis) नावाचा आजार होता, ज्यामुळे त्यांना बोलणे आणि टाइप करणे कठीण झाले होते.
त्यांनी अरुण मेहता आणि विक्रम कृष्णा यांना eLocutor विकसित करण्यासाठी संपर्क साधला.
या दोघांनी मिळून eLocutor तयार केले, ज्यामुळे स्टीफन हॉकिंग यांना त्यांचे विचार व्यक्त करणे सोपे झाले.
अरुण मेहता आणि विक्रम कृष्णा यांचे कार्य स्टीफन हॉकिंग यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. त्यांनी विकसित केलेले eLocutor हे तांत्रिक नविन्याचे उत्तम उदाहरण आहे आणि यामुळे अपंग व्यक्तींना संवाद साधण्यात मदत झाली
हे खूप मोठे संशोधन होते पण अरुण मेहता आणि विक्रम कृष्णा यांना म्हणावे तेवढे, म्हणावे तेवढे काय? काहीच ओळख मिळाली नाही भारतीय मीडिया कडून.
जेव्हा हॉकिंग भारतात आले तेव्हा त्यांची स्पेशल व्हील चेअर बसेल अशी गाडी महिंद्रा कंपनीने स्पेशली डिझाईन केली होती. आणि त्यांनी 59 वा वाढदिवस ओबेरॉय टॉवर्स मध्ये सेलिब्रिट केला होता.
अजून असे अनेक इंजिनिअर, वैज्ञानिक आहेत ज्यांची बातमी आपल्या पर्यंत पोचत नाही, किंवा पोचवली जात नाही, आपल्या समोर तेवढाच इतिहास मांडला जातो जेवढा फक्त पोलिटीशन्स च्या फायद्याचा असतो, तो सुद्धा मनाप्रमाणे मांडला जातो.
अरुण मेहता आणि विक्रम कृष्णा यांना सुद्धा इंटर्नशनल मीडिया ने प्रसिद्धी दिली…पण आपल्या कडे कुठल्या मीडियावर हे दाखवले होते कोणाला आठवते का?
“Indians are so good in math and physics”
– Stephen Hawking।
आपल्यासाठी


