‘स्व-गणना’ कशी करायची त्यासाठीची लिंक

जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील स्व-गणना करण्यासाठी प्रशासनामार्फत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
कसे कराल नोंदणी?
१. https://se.census.gov.in/ या पोर्टलवर जा.
२. कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी करा.
३. OTP टाकून भाषा निवडा आणि पिन कोडसह घराचे स्थान निश्चित करा.
४. ३० प्रश्नांची प्रश्नावली भरून ‘Submit’ करा.
स्वगणना म्हणजेच आपल्या घरा संदर्भातली संपूर्ण माहिती नोंदविण्यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम खालील लिंक वर 👇👇👇👇https://se.census.gov.in
कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी.
भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत ‘स्वगणनेचा’ विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी.
एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ‘H’ या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी ‘SE ID’ प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग घ्यावा.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
भारतात पहिली जनगणना १८७२ मध्ये लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली.
नियमित जनगणना: १८८१ पासून दर १० वर्षांनी नियमितपणे जनगणना करण्यास सुरुवात झाली.
स्वातंत्र्योत्तर: १९४७ नंतरची पहिली जनगणना १९५१ मध्ये झाली. २०११ ची जनगणना ही भारताची १५ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ७ वी जनगणना होती.
जनगणना २०२७ (आगामी जनगणना)
कोविड-१९ मुळे २०२१ मध्ये होणारी जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. आता ती २०२७ मध्ये होणार आहे.
पहिली डिजिटल जनगणना: ही भारताच्या इतिहासातील पहिलीच डिजिटल जनगणना असेल. माहिती गोळा करण्यासाठी कागद-पेन ऐवजी मोबाईल ॲप्सचा वापर केला जाईल.
स्वयं-नोंदणी (Self-Enumeration): १ मे २०२६ पासून महाराष्ट्रात या सुविधेची सुरुवात झाली आहे. नागरिक स्वतः se.census.gov.in या पोर्टलवर जाऊन आपली माहिती भरू शकतात.
दोन टप्पे: ही प्रक्रिया दोन टप्प्यात होईल – १ ऑक्टोबर २०२६ पासून घरांची यादी तयार करणे आणि १ मार्च २०२७ पासून प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी.
२०११ च्या जनगणनेची काही महत्त्वाची आकडेवारी
२०२७ च्या अंतिम आकडेवारीपर्यंत २०११ चा डेटा अधिकृत मानला जातो:
एकूण लोकसंख्या: १२१.०९ कोटी.
लिंग गुणोत्तर: ९४३ स्त्रिया प्रति १००० पुरुष.
साक्षरता दर: ७४.०४%.
सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य: उत्तर प्रदेश.
सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य: सिक्कीम.



