वर्गसंघर्षाच्या मुळाशी जात व्यवस्था
मानवाची जात धर्म पंथ,उपजात या सर्व गोष्टी त्याच्या जन्मानेच ठरत असतात.त्यामुळे एखाद्याची इच्छा असूनही त्याला इतर गोष्टी करता येत नाहीत.म्हणूनच देशात हजारो वर्षापासून सुरु असलेली वर्ग आणि त्यांनतर आलेली जात व्यवस्था संपूष्टात येण्याचे नाव घेत नाही म्हणूनच सामाजिक न्यायाच्या गोष्टी केवळ कायद्याच्या चौकटीपुरत्याच मर्यादीत राहील्या आहेत.
जात आणि वर्ग हा संघर्ष तर गौतम बुध्दांच्या काळापासून चालत आलेली व्यवस्था असून आता व्यवसाय आणि भांडवलव्यवस्थेत नवीन वर्ग संघर्ष सुरु झाला आहे.देशातून जात व्यवस्था संपूष्टात आल्याशिवाय वर्ग संघर्ष संपणार नाही.कारण वर्गसंघर्षाच्या मुळाशी जात व्यवस्था असून ती हजारो वर्षापासूनच्या वर्ग व्यवस्थेतूनच जात व्यवस्थेचा विकास झाला आहे म्हणून सामाजिक विकासासाठी आणि खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापेनेसाठी या बाबी संपुष्टात आल्या तरच गौतमबुध्दांनी ,महात्मा बसवेश्वर यांच्या पासून ते अनेक संत पुरुषांनी व अलिकडच्या काळात राम मनोहर लोहिया,जयप्रकाश नारायण ,राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेंडकर यांच्या विचारांशी मिळती जूळती समाज व्यवस्था निर्माण करता येवू शकेल.
देशाच्या विकासाचा मार्ग सामाजिक विकासातूनच प्रशस्त् होत जातो आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग केवळ सामाजिक प्रयत्नातून सुटू शकणार नाही म्हणून तो इतर मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत याच विचारातून राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून जात आणि वर्ग व्यवस्थेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत हा विचार आरक्षण देण्यामागे होता. पण् आता राजकारण देखिल मानवी समस्येऐवजी मावनी भावनांशी जोडले जात असून पुन्हा जात ,धर्म आणि वर्ग व्यवस्थेच्या गोष्टीत राजकारण आंखड बुडालेले आहे. राजकारणाच्या सर्वसमावेशक सकंल्पनेला तडा गेला असून ते वर्ग ,जात ,धर्माशी निगडीत झाल्याने पुन्हा संघर्षाची स्थिती येवू पाहत आहे. दुर्देव याचे आहे की समाजातील घटक देखिल त्याच्यातच समाधान मानतो आहे.म्हणून महापुरुषांनी पाहीलेली स्वप्न अद्यापही अर्धवट राहीलेली दिसतात. समाज आणि राजकारणात सामाजिक उत्थानाचा असलेला विश्वास आता उडाला आहे.
सरकारे एक जैसी होती है असे माजी पंतप्रधन अटबिहारी बाजपेयी म्हण्त असत त्याप्रमाणे अनेक सरकारे झाली पण सामान्यांची फज्ञर मोठी क्रांती आली असे म्हणता येणार नाही. सरकारचे चरित्र बदलले तरच सामांन्याच्या भोवती असलेले दुष्ट चक्र त्याला भेदता येवू शकते.सामान्यांच्या समन्यायी योजनेतील शुक्राचार्य जोपर्यंत शोधले जात नाहीत तोपर्यंत गरीब अधिक गरीब होतच राहणार .



