लातूर जिल्हा

लातूर शहरातील नागरी समस्या सोडवा: भाजपाची मागणी

सिध्देश्वर मंडळ प्रमुख

लातूर शहरातील गंभीर नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी सिद्धेश्वर मंडळ, लातूर शहर यांच्या वतीने लातूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाचे नेतृत्व भाजपा सिद्धेश्वर मंडळाचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी केले.
गावभाग, सुभाष चौक, गांधी मार्केट व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सध्या नालेसफाई, अस्वच्छता, प्रकाशअभाव, वाहतूक कोंडी व अनधिकृत गाड्यांमुळे त्रस्त आहेत. या समस्यांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी करण्यात आली आहे. “शहरातील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. यापुढेही योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल.”
शिष्टमंडळात प्रमुख उपस्थित:- दीपक सावंत, राहुल एडके, गंगाधर जाधव, विकास रणदिवे, अक्षय सुरवसे, शंकर कांबळे, बालाजी जाधव, सुहर्ष कांबळे, श्रीकांत सोमवंशी, बाळू होनमाने, अजय एडके, शुभम पारवे, कुणाल एडके, ओमकार केंगार, ओमकार रणदिवे, शुभम केंगार, धनराज जाधव , व्यंकटेश जाधव आदी. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/