
लातूर : 14 जून व 15 जून 2025 रोजी लातूर येथे शिवा लिंगायत युवक संघटनेच्या वतीने उच्च विद्याविभूषितांचा विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती मेळाव्याचे मुख्य संयोजक व संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील यांनी दिली आहे.
या मेळाव्यात इंजिनीयर ,डॉक्टर, सरकारी अधिकारी, सरकारी नोकरदार, आणि त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांचा खास वधू वर परिचय मेळावा दिनांक 14 जून व 15 जून 2025 रोजी लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालय, जुनी रेल्वे लाईन, बार्शी रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री श्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते दि. 14 जून रोजी सकाळी 9.00 वाजता संपन्न होणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमास अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात येणाऱ्या वधू – वर पालक पित्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिनांक 14 जून रोजी फ्रीझोन वधू-वर पालक परिचय संध्याकाळी चार ते रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. मुक्कामी येणाऱ्या वधू-वर व पालकांना विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नुकतीच एक व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संयोजनाच्या सुसूत्रतेसाठी विविध समित्या तयार करण्यात आले असून जबाबदाऱ्या विभागण्यात आले आहेत. बैठकीत संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद पाटील यांनी मेळावा आयोजना पाठीमागची भूमिका आणि यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या खबरदारी व उपायांची सविस्तर चर्चा केली.
मेळावा निमंत्रण पत्रिका पीडीएफ. 👇👇👇
nimtran patrika



