
लातूर : संस्कृती फाउंडेशन लातूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व रोग निदान तपासणी, रक्तदान शिबिर, आदींचा त्यात समावेश होता. रोजीमोफत सर्व रोज तपासणी, निदान व उपचार शिबिराचे
त्यात 377 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महा, चे शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. मेघराज चावडा उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. महेश कोळखेरे , मा. मयूर बनसोडे, महापालिका आरोग्य अधिकारी श्री. डॉ. शंकर भारती उपस्थित होते .
डॉ. भालचंद्र ब्लड बँक, येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात जवळपास 48 जणांनी रक्तदान केले.
न्यू गांधी मार्केट लातूर येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमा पूजन व आरती करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर , विश्व हिंदू परिषदेचे अँड. सुजित जी देशपांडे, मयूर बनसोडे तसेच परिसरातील अनेक व्यापारी बंधूंनी हजेरी लावली होती.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाकरिता जयंती समितीचे अध्यक्ष महावीर आयवळे उपाध्यक्ष दीपक सावंत , सचिव पवन रणदिवे, कोषाध्यक्ष अँड. विक्रम गायकवाड, कार्याध्यक्ष धनराज जाधव गंगाधर जाधव, गोविंद जाधव , विकास रणदिवे , सुनिल रणदिवे, बाळू रणदिवे अन्य कार्यकर्ते मेहनत घेतली आहे.



