लातूर जिल्हा
लिंगायत महासंघ चाकूर शहर चिटणीसपदी शिवकुमार होळदांडगे

चाकूर:येथील शिवकुमार होळदांडगे यांची लिंगायत महासंघाच्या चाकूर शहर चिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
येथील विश्वशांतीधाम मंदिर येथे एका कार्यक्रमात लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार,माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव,श्री १०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज, संजय स्वामी महाराज यांच्या हस्ते शिवकुमार होळदांडगे यांची लिंगायत महासंघाच्या चाकूर शहर चिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे,शहराध्यक्ष संजय पाटील,महादेव हाळे,राम पाटील उपस्थित होते.



