
जगमंगल सोशल फाऊंडेशन आणि ग्रामीण महिला विकास संस्था, देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने वलांडी येथे देवणी तालुक्यातील 13 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींसाठी स्वयम स्किल हा कौशल्य आधारित उपक्रमाची आज सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला स्वीस हेड पुणे आणि युरोपियन युनियन यांचे सहकार्य लाभले आहे. जगमंगल सोशल फाऊंडेशन संचलित, स्वयंमतेज अकॅडमी, लातूर हे या उपक्रमांतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण कार्य पूर्ण करणार आहेत.



