लातूर जिल्हा

शुभांगी राघो बेस्ट अबॅकस टीचर ऑफ द इयर

नूतन क्लासेसचे यश

सोलापूर येथे आयोजित सातव्या नॅशनल लेव्हल मेट्रो ब्रेन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड आयोजित कॉम्पिटिशन मध्ये नूतन क्लासेसच्या संचालिका शुभांगी परमेश्वर राघो यांना बेस्ट अबॅकस टीचर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत एकूण 14 मुलांनी सहभाग नोंदवला त्यापैकी सहा मुलं टॉपर आली आहेत.
नम्रता गांजुरे Z5मधून प्रथम, श्रावणी इंदलकर Z6 मधून द्वितीय, अरवी धावडकर Z6 मधून तृतीया आली आहे. A कॅटेगिरी मधून आकाश माने A7 मधून प्रथम, रामेश्वरी राघो A5 मधून द्वितीय, इशिका चामले A8 तृतीय आली आहे. मेट्रो ब्रेन एज्युकेशन संचालक संतोष लोहारे,सीमा लोहारे, सिने अभिनेते विजय पाटकर, ओम यादव या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
नॅशनल लेव्हल स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन पर विविध कॅटेगिरी मधून टॉप टेन मधील अचीवर ट्रॉफी जिंकल्या. यात श्रीनिवास बनकर, राजवीर पाटील, वैभवी गाडी लोहार, भीमाशंकर हावरे, शर्व धावडकर, सोहम मोरखंडे, मन्मथ वलांडे, श्रीनाथ पोद्दार या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/