महाराष्ट्र

सारथी देणार वाहन चालक प्रशिक्षण

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी यांच्या वतीने राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, व मराठा कुणबी या सारथीच्या लक्ष्य गटातील वय 20 ते 45 मधील युवकांना तीस दिवसाचे सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम लाईट मोटर व्हेईकल प्रशिक्षण वाहन चालक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल साठी देखील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या अनुषंगाने वरील प्रवर्गातील युवकांनी वाहन चालक प्रशिक्षण घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी 10 जानेवारीपासून अर्ज करण्याला प्रारंभ होत असून प्रशिक्षणार्थी उमेदवारांना 10,000 विद्यावेतन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी एकूण 1500 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी पात्र असणार नाही.
ही योजना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत असलेल्या आय. डी. टी. आर. पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.
बेबसाईट पत्ता
http:sarthi-maharashtragov.in>Notice Board>Skill Development
या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी
जाहिरात
sarthi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/