देश -विदेश

नक्षलवादी हमला आठ जवान शहीद

दंतेवाडा विजापूर मधील घटना

दन्तेवाडा नारायणपूर बीजापूर येथून दहशतवादी विरोधातील संयुक्त कारवाई मोहीम आटोपून सैन्य दलाच्या तुकड्या परतत असताना नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या मधोमध पेरलेल्या आयडी चा स्फोट घडवून आणला. या मध्ये DRG दलातील जवान व त्या गाडीचा ड्रायव्हर असे एकूण नऊ जण मृत पावले आहेत स्फोट इतका जबरदस्त होता की त्या स्फोटात गाडीचे तुकडे तुकडे तर झालेच पण जवानांच्या मृतदेहाच्या देखील अवशेष विखरून पडलेले होते. या संदर्भात बस्तर चे आयडी यांनी माहिती देताना दंतेवाडा DRG चे आठ सैनिक आणि एक ड्रायव्हर मारला गेल्याची पुष्टी केली आहे.
नक्षलवादी कारवाई मोहिमेचे एडीजी विवेकानंद सिन्हा यांनी, नक्षलवाद्यांनी हा घात लावून हमला केला त्यात आमचे जवान शहीद झाले असून सैन्यांनी लगेच प्रती कारवाई सुरू केले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. हा घात बीजापूरच्या कुटूर या रस्त्यावर घडवून आणला असल्याचे ते म्हणाले

शहीद जवानांना विनम्र श्रद्धांजली 💐💐💐

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/