
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी 2.0 विराजमान होणार आहेत. तेथील लोकांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
त्या अपेक्षांमध्ये
1.प्राधान्याने इतर देशातून अमेरिकेत होणारे अवैध स्थलांतर रोखण्यासाठी सर्वाधिक लोकांनी मागणी केली आहे.
2.त्याबरोबरच देशातील अस्थिर होणारे वातावरण हे स्थिर ठेवण्यासाठी कोणतेही प्रकारे देशाला युद्धापासून लांब ठेवावे ही दुसरी मागणी आहे.
3.अमेरिकेतील वाढती गुन्हेगारी देखील एक मोठी समस्या बनली असून ती देखील ट्रम्प प्रशासनाने कमी करावी ही जनतेची अपेक्षा.
4. त्याबरोबरच अमेरिकेत असलेल्या वांशिक वादावरून सुरू असलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी या पार्श्वभूमीकडे लोकांनी लक्ष वेधले आहे.
5. शैक्षणिक क्षेत्रातल्या सुधारणा गरजेचे असल्याचे लोकांना वाटते
यावरील समस्या बरोबरच इतरही काही समस्यांकडे अमेरिकन जनतेने ट्रम्प यांच्याकडे आपल्या अपेक्षा नोंदवले आहेत या जनतेच्या अपेक्षेला ट्रम्प कितपत खरे उतरतील हे काळच सांगेल.
म्हणजेच अमेरिकन जनता विकसित असली तरी त्यांच्यापुढेही अनेक समस्यांचा असल्याचे आपल्याला दिसून येते. या सर्व अडचणी समस्या सोडवण्याचे आता ट्रम्प प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे.



