लातूर जिल्हा
थर्टी फर्स्ट शुद्धीत साजरी करा- जिल्हा पोलीस अधीक्षक
उदगीरात नाकाबंदी -पी आय राजकूमार पुजारी
आज थर्टी फर्स्ट असून तरुणाई नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोषात तयार आहे. नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष झालाच पाहिजे मात्र तो बेधुंद न होता शुद्धीत आणि जाणतेपणाने झाला पाहिजेत. यासाठी तरुणांनी कुठल्याही प्रकारच्या नशील्या पदार्थाचा वापर न करता शुद्धीमध्ये थर्टी फर्स्ट साजरी करावी असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी केले आहे.
उदगीर मध्ये अशा मध्यधुंद अवस्थेत थर्टी फर्स्ट साजरे करणाऱ्या युवकांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी नांदेड नाक्यावर , बिदर रोड आणि देगलूर रोडवरील कॅप्टन चौक या ठिकाणी चेकपोस्ट तयार केली शिवाय ब्रीथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी आमच्या प्रतिनिधीलि दिली.




