लातूरकरांना मिळणार लघुपटांची मेजवानी
23 आणि 24 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

अभिजात फिल्म सोसायटी, लातूर आणि दयानंद शिक्षण संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, पहिल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन, दयानंद सभागृह लातूर येथे दिनांक 23 आणि 24 डिसेंबर 2024 रोजी केले जात आहे.
या लघुपट महोत्सवात एकंदरीत पाच देशातील आणि पंधरा राज्यातील 180 पेक्षा अधिक लघुपट, ॲनिमेशन पट आणि इतर प्रकारातील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. त्यातील निवडक आणि दर्जेदार लघुपटांचे सादरीकरण दयानंद सभागृहात सोमवार दिनांक 23 आणि मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 पासून लातूरच्या सिने रसिकांसाठी केले जाणार आहे.
लातूरकरांनी या लघुपट महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या लघुपटांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजक श्री जितेंद्र पाटील, डॉ स्वप्नील देशमुख, डॉ. विश्वास शेंबेकर, श्री धनंजय कुलकर्णी, दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे
सोमवार दिनांक 23 रोजी दाखवले जाणारे चित्रपट






