विस्ताराधिकारी किशोरी जोशी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तेरणा नगर बीटचा दबदबा


धाराशिव : 17 डिसेंबर 2024 रोजी धाराशिव येथे आयोजित केलेल्या “समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयावर आधारित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सौरचलित बहुउपयोगी उपकरणास तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला . सदरील प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटातून 118 शाळांनी प्रयोग सादर केले होते.या सर्वांमधून खामगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकावला .विशेष म्हणजे सदरील शाळेने मागील पाच वर्षापासून विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले यश अबाधित ठेवलेले आहे.
यामध्ये कु.ज्ञानेश्वरी उत्तरेश्वर मडके कु.क्षितिजा गणेश सावंत व विघ्नेश विक्रम अंधारे या विद्यार्थ्यांनी या प्रयोगाचे सादरीकरण केले त्यांना मार्गदर्शन म्हणून विज्ञान शिक्षक श्री राहुल बाबर सर तसेच सहकारी शिक्षक श्री गुणवंत चौगुले सर श्री दत्तात्रय मेटे सर ,श्रीमती दांगट मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .तसेच जयहिंद विद्यालयातील श्री. पालके सर यांनी बेस्ट फ्रॉम वेस्ट या शैक्षणिक सहित्यास चार शिक्षकांमधून प्रथम क्रमांक पटकावला तसेच फिरती सौर विध्युतदाहिनी हा प्रकल्प जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कू.मयुरी सतीश सपाटे हिने सादर केला होता या प्रयोगासाठी उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला तिला विज्ञान शिक्षक श्री.यावलकर जी.एस.यांचे मार्गदर्शन लाभले.यशाबद्दल तेरणा नगर बीटच्या विस्ताराधिकारी आदरणीय श्रीम. किशोरी जोशी मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक व शाळेतील सर्व टीमचा प्रत्यक्ष शाळेत जाऊन सत्कार केला, तसेच केंद्रप्रमुख श्री जगदीश जाकते साहेब व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा देशमुख तसेच शालेय व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थांमधून विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.



