देश -विदेश

जगाला व्यापार युद्धाच्या खाईत लोटले जातेय

डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर अतिशय अग्रेसिव्ह पणे काही निर्णय घेत आहेत व घेतले आहेत. त्याचे जागतिक व्यापारावर चांगले वाईट परिणाम होऊ शकतात. अमेरिकेत आयात वस्तूवरील करात वाढ केल्यावरून इतर राष्ट्रांनीही अमेरिकन वस्तूवर आम्ही आयात कर वाढवू अशी धमकी देत अमेरिकेसोबत व्यापार युद्धाला तयार असल्याचे म्हटले आहे.

याबाबतीत अमेरिकेच्या रडारवर असलेला नंबर एकचा देश म्हणजे चीन अमेरिकेने चिनी वस्तूवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी सुरुवात केली असून त्या विरोधात चीनने व्यापार युद्ध असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे युद्ध, आम्ही तयार आहोत असे चीन च्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी जाहीर केले आहे.

वॉशिंग्टनने चिनी वस्तूंच्या उत्पादनांच्या आयातीवर दुप्पट शुल्क आकारण्याच्या निर्णय घेतला आहे. जर अमेरिकेने व्यापार युद्ध असेच सुरू ठेवले तर चीन देखील त्यात सहभागी असेल असे जाहीर करून अमेरिकेसोबत शेवटपर्यंत युद्ध लढण्याची प्रतिज्ञा केली.

बीजिंगने अमेरिकेवर फेंटॅनिल संकटाचा वापर शुल्क वाढीचे समर्थन करण्यासाठी “कमी सबबी” म्हणून केल्याचा आरोप केला आणि अमेरिकन वस्तूंविरुद्ध प्रत्युत्तरात्मक उपाययोजनांची घोषणा केली. “जर अमेरिका… टॅरिफ युद्ध, व्यापार युद्ध किंवा इतर कोणत्याही प्रकारचे युद्ध करत राहिली, तर चिनी बाजू त्यांच्याशी शेवटपर्यंत लढेल,” असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले आहे.
या व्यापार युद्धाचे परिणाम म्हणून विकसनशील राष्ट्रातील शेअर बाजार अस्थिर बनले असून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेनुसार अनेक अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना त्याचा मोठा फटका बसत आहे आगामी कालखंडात त्याचे विपरीत परिणाम अधिक दिसू लागतील. या ट्रेड वरचा फटका भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूवर लादल्या जाणाऱ्या अतिरिक्त करामुळे निर्यात मंदावू शकते शिवाय जीडीपी दर कायम राखण्यात भारताला कठीण जाण्याची शक्यता वर्तवली जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/