FLash

अबब…. प्लास्टिक पोहचले मानवी मेंदूत

प्लास्टिक आमच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला असून तो केवळ बाह्य जीवनातला घटक नसून आता तो आमच्या शरीरांतर्गत असलेल्या अवयवांचा देखील घटक बनला आहे. कारण शरीरातील जवळपास सर्वच अवयवात आता प्लास्टिकचे न्यानो कण सापडले आहेत आता मेंदूत देखील प्लास्टिकचे कण सापडले आहेत.

आपण उपहासात्मक तुझ्या डोक्यात काय शेण भरले आहे का असे म्हणतो, पण शेण देखील गुणात्मक दृष्ट्या चांगले आहे, जमिनीची सुपीकता त्यामुळे वाढते. पण आता तुझ्या डोक्यात काय प्लास्टिक भरले आहे का असे म्हणण्याची वेळ आली आहे. याबाबत संशोधकांनी इशारा दिला असून आपण प्लास्टिक वापराची धोकादायक पातळी ओलांडल्याचे म्हटले आहे. संशोधकांनी इशारा दिला की,मानवी मेंदूमध्ये एका चमच्याइतके प्लास्टिक सापडत आहे. मानवी मेंदूच्या ऊतींमध्ये मायक्रोप्लास्टिक जमा होण्याचे नवीन पुरावे समोर आले आहेत.

ब्रेन मेडिसिन जर्नलमध्ये या बाबत नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. मानवी मेंदूमध्ये अंदाजे चमच्याइतके मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक्स (MNPs) असतात, ज्याचे प्रमाण दस्तऐवजीकरण केलेल्या डिमेंशिया निदान असलेल्या व्यक्तींमध्ये 3-5 पट जास्त असते.
तरीही चिंताजनक बाब म्हणजे, मेंदूच्या ऊतींमध्ये यकृत किंवा मूत्रपिंडासारख्या इतर अवयवांच्या तुलनेत MNPs चे प्रमाण 7-30 पट जास्त दिसून आले.जे अत्यंत धोकादायक पातळीवर आहे.

“२०१६ ते २०२४ पर्यंत फक्त आठ वर्षांत मेंदूच्या मायक्रोप्लास्टिक सांद्रतेत झालेली नाट्यमय वाढ विशेषतः चिंताजनक आहे,” असे ओटावा विद्यापीठाच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख लेखक डॉ. निकोलस फॅबियानो म्हणाले. “ही वाढ पर्यावरणीय मायक्रोप्लास्टिक पातळीत आपण पाहत असलेल्या घातांकीय वाढीचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष चिंतेची बाब म्हणजे २०० नॅनोमीटरपेक्षा लहान कण, जे प्रामुख्याने पॉलीथिलीनपासून बनलेले आहेत, जे सेरेब्रोव्हस्कुलर भिंती आणि रोगप्रतिकारक पेशींमध्ये लक्षणीय जमा होतात.
मानवाने प्लास्टिकच्या अतिवापरातून जल, जमीन, जंगल आणि अवकाश सोडले नाही. या सर्वच ठिकाणी प्लास्टिकचा न कुजणारा वर्षानुवर्षे तसाच राहणारा व मानवी जीवनाला अत्यंत घातक ठरणारा प्लास्टिकचा कचरा साठलेला आहे. त्यामुळे जीवन चक्र प्रभावित झाले आहे. प्लास्टिक आता मानवी शरीराला व्यापत आहे आता तरी आपण याबाबतीत जागरूक होऊन डोळसपणे सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणे बंद केले पाहिजे. पाण्याची बाटली, रेडी टू इट्स, युज अॅड थ्रो यासारख्या मधुन नॅनो प्लास्टिक कचरा पोटात जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/