FLash

80 टक्के आयटी वाल्यांना कोणत्या आजाराचा धोका


अमाप पैसा, कामाचे अनियमित तास त्यामुळे खाण्यापिण्यावर होणारे परिणाम आणि एकंदरीत बदललेली जीवनशैली याचा दुष्परिणाम आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांवर दिसून येत असून अतिशय गंभीर आजार या क्षेत्रातील लोकांना जडत आहेत.

भारतातील आयटी क्षेत्रातील आर्थिक तेजी आरोग्य संकट घेऊन येत असून या क्षेत्रातील ८०% कर्मचारी फॅटी लिव्हर आजाराने ग्रस्त आहेत अशी माहिती डॉ मेघराज इंगळे यांनी दिली आहे.

या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आधुनिक जीवन शैलीचे जीवन जगतात. त्यात आहार, विहार, व्यायामाची कमतरता आणि जागरण त्या सर्वांचे परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा आणि फॅटी आजार वाढतो आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे देशातील प्रत्येक तिसऱ्या भारतीयाला फॅटी लिव्हर आजार जडत आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होत आहे. यासाठी तातडीने जीवनशैलीत बदल आणि तसेच कामाचे तास आणि वाढणारा ताण यातही बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
भारतात आयटी उद्योग वेगाने वाढत आहे. क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हैदराबाद विद्यापीठाने केलेल्या एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील ८०% आयटी कर्मचारी फॅटी लिव्हर आजाराने ग्रस्त आहेत. आयटी कर्मचारी मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज (MAFLD)2 ने ग्रस्त आहेत. ही अशी स्थिती आहे जिथे यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते आणि अवयवाचे नुकसान होते. पण हे एका आजाराबद्दल, किंवा एका उद्योगाबद्दल किंवा एका देशाबद्दल नाही. जगभरातील जीवनशैलीशी संबंधित आजार असल्याने जीवनशैलीत योग्य बदल करून अशा आजारापासून दूर राहता येईल.

“सामान्य BMI असूनही यकृतातील चरबी जमा होण्याचा धोका कमी असलेल्या MASLD चा धोका भारतात विशेषतः सामान्य आहे, कारण आहारातील कमतरता, अनुवांशिक पूर्वस्थिती आणि पचनसंस्थेतील बिघाड यामुळे असे आजार होतात.

यकृत हा शरीरातील एक फुटबॉलच्या आकाराचा सर्वात मोठा अवयव आहे. त्याचे कार्य रक्त स्वच्छ करणे, ऊर्जा साठवणे आणि पचनास मदत करणे आहे. कधीकधी अवयवात चरबी जमा झाल्यावर ते खराब होते. जेव्हा ते धोकादायक पातळीपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. जेव्हा तुमचे यकृत नेहमीपेक्षा जास्त चरबी साठवते तेव्हा ते आणखी सूजू शकते. यामुळे यकृताच्या नुकसानासह गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
हा धोका टाळण्यासाठी आहारावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून व्यायाम देखील अत्यावश्यक ठरतो. जीवनात जेवढा पैसा संपत्ती म्हणून महत्त्वाचा असतो तेवढेच शरीर देखील संपत्ती असून तिचेही रक्षण करणे आपलीच जबाबदारी असते. फॅटी लिव्हरच्या खुणा चेहरा मान यावर स्पष्ट दिसायला लागतात. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असणारा लिव्हर चांगल्या सिटी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/