देश -विदेश

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

प्रवेश परीक्षा नोंदणी लिंक बातमीत

नवोदय विद्यालयाची शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इयत्ता पाचवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 13 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाच्या वतीने देशभर सहाशे पेक्षा अधिक नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून सीबीएस अभ्यासक्रमाच्या आधारे दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यात सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. दरवर्षी इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी निवड चाचणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 2026 – 2027 या शैक्षणिक वर्षासाठी दोन टप्प्यांत निवड चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याची पहिली परीक्षा दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी तर दुसरी चाचणी परीक्षा दि. 11 एप्रिल 2026 रोजी घेतली जाणार आहे.
या परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्याची तारीख मात्र 29 जुलै 2025 आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही. यावर्षीपासून नाव नोंदणी सुलभ करण्यात आली असून त्यात अनेक बदल झाले आहेत. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे परीक्षेसाठीच्या ऑनलाईन अर्जासोबत लगेचच जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक नाही. ज्यामुळे अनेक पालकांना अडचणी येत होत्या.
ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी ही दि. 1 मे 2014 ते 31 जुलै 2016 या दरम्यान जन्मलेला असावा. तो इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारा किंवा पास असावा या दोन मुख्य अटी आहेत. ऑनलाइन नावनोंदणीसाठी लिंक 👇👇👇👇👇👇
https://navodaya.gov.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/