अभियांत्रिकीतील प्रवेश 1 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान

बी. ई. आणि बी.टेक. या पदवीस्तरावरील अभियांत्रिकी चे पहिल्या फेरीतील प्रवेश 1ऑगस्ट 3 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार असून संपूर्ण चारही फेऱ्या 4 सप्टेंबर 25 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 मधिल अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता यादी, राज्य गुणवत्ता यादी, विविध प्रवर्गनुसार गुणवत्ता यादी, मुलींसाठी राखीव कोटा, अशा विविध गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
या यादीतील प्राप्त रँक नुसार 26 ते 28 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंती क्रम द्यावे लागेल. त्यानंतर पहिल्या फेरीतील निवड यादी 31 जुलै 25 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना 1 आॅगस्ट ते 3 ऑगस्ट 25 दरम्यान महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
दुसरी फेरी
त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी च्या रिक्त जागा 4 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना 5 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान आपले महाविद्यालय पसंती क्रमांक द्यावयाचे आहेत. दुसऱ्या फेरीची निवड यादी 11 ऑगस्ट 25 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार येईल. त्यासाठीचे प्रवेश 12 ते 14 ऑगस्ट 2025 दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन निश्चित करावयाचे आहेत.
तिसरी फेरी
तिसऱ्या फेरीसाठी च्या रिक्त जागांची यादी 15 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर केले जाणार असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंती क्रमांक नोंदण्यासाठी 17 ते 19 ऑगस्ट 2025 दरम्यान चा कालावधी देण्यात आला आहे. तिसऱ्या फेरीतील निवड यादी 22 ऑगस्ट 25 रोजी प्रकाशित होणार असून, विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश 23 ते 25 ऑगस्ट 2025 दरम्यान निश्चित करावयाचे आहेत.
चौथी फेरी
चौथ्या फेरीतील प्रवेशासाठी रिक्त जागांची यादी 26 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर केले जाईल. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंती क्रमांक 28 ते 30 ऑगस्ट 25 दरम्यान नोंदणी करता येतील. निवड यादी 1 सप्टेंबर 25 रोजी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांना 2 ते 4सप्टेंबर 25 दरम्यान आपला प्रवेश महाविद्यालयात जाऊन निश्चित करावा लागणार आहे.
कोणत्याही शाखेतील घेतलेला प्रवेश किंवा कोणत्याही महाविद्यालयात घेतलेला प्रवेश रद्द करण्यासाठी 11 सप्टेंबर 2025 पर्यंतची मुदत विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे.
राज्यात बी.ई./ बी.टेक. अभ्यासक्रमसाठी 160000 पेक्षा अधिक जागा असून पीसीएम ग्रुपचे राज्य सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 422863 इतकी आहे.




