
विद्यावर्धिनीतील चंद्रशेखर बर्गे बेस्ट फायरर – ज्यु. अंडर ऑफिसर सागर सोनवणे, पुरुष अष्टपैलू खेळाडू शैलेश पावरा महिला अष्टपैलू खेळाडू लता वसावे, विद्यापीठ सुवर्णपदक विजेत्या हर्षदा पाटील, खुशी अग्रवाल मीनाक्षी ईशी, दिव्यांग कलावंत पवन मराठे, धनंजय पाटील, राज्यस्तरीय जुडो स्पर्धेतील विजेता आदित्य गोसावी, सेट परीक्षा उत्तीर्ण शुभांगी देशमुख व तेजस कुलकर्णी आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या गुरुप्रसाद चव्हाण हे पुरस्काराने सन्मानित
धुळे: विद्यार्थ्यांनी आपल्यातील कमकुवत दुव्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून ते दूर करीत आत्मविकास घडवावा, असे प्रतिपादन कबचौ उमवीचे प्रकूलगुरु प्रा. एस. टी. इंगळे यांनी येथील विद्यावर्धिनी सभेचे डॉ. एम. वाय. वैद्य कला, प्रा. पी. डी. दलाल वाणिज्य आणि डॉ. डी. एस. शाह विज्ञान महाविद्यालयात केले.
महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षीय भाषणात प्र. कुलगुरू प्रा. डॉ. इंगळे बोलत होते.
आज विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले असून त्यात अभ्यासासोबतच अभ्यास पूरक व अभ्यासेतर शैक्षणिक बाबींना खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे; याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी, अशी सूचनाही यावेळी डॉ. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना केली.
प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रतिकूलता येते. पण या प्रतिकूलतेला कधीच यशाच्या मार्गातील अडथळा बनू देऊ नका, असे आवाहन अतिरिक्त अधीक्षक किशोर काळे यांनी विद्यार्थ्यांना केले. आजच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच नवीन आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात करावे, असा सल्लाही त्यांनी याप्रसंगी दिला.
याप्रसंगी प्रा. शरद पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण यशाची माहिती दिली. विद्यार्थी सभेचे अध्यक्ष कॅ. डॉ. कैलास बोरसे यांनी यावेळी अहवाल सादर केला.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या पारितोषिक वितरण समारंभात बेस्ट कॅडेट – अंडर ऑफिसर चंद्रशेखर बर्गे बेस्ट फायरर – ज्यु. अंडर ऑफिसर सागर सोनवणे, पुरुष अष्टपैलू खेळाडू शैलेश पावरा महिला अष्टपैलू खेळाडू लता वसावे, विद्यापीठ सुवर्णपदक विजेत्या हर्षदा पाटील, खुशी अग्रवाल मीनाक्षी ईशी, दिव्यांग कलावंत पवन मराठे, धनंजय पाटील, राज्यस्तरीय जुडो स्पर्धेतील विजेता आदित्य गोसावी, सेट परीक्षा उत्तीर्ण शुभांगी देशमुख व तेजस कुलकर्णी आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या गुरुप्रसाद चव्हाण यांच्यासह शैक्षणिक कला, क्रीडा आणि विविध स्पर्धा मधील विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सूत्रसंचालन व यादी वाचन डॉ सतीश निकम, संतोष खत्री, विजय पालवे, निलेश रोटे, वैशाली पाटील, उज्वला वाणी व शुभांगी देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत लगडे, प्रशांत काळे, डॉ. आशा काटे, अंकुश गायकवाड, शालिग्राम गर्दे, अक्षय जोशी व अशोक मुजगे आदींनी परिश्रम घेतले.



