किशन उगले यांना संत नामदेव महाराज पुरस्कार
व्यंकटराव देशमुख विद्यालय बनशेळकी ता उदगीर जि लातूर येथील शिक्षक श्री किशन दत्तात्रय उगले शेकापूरकर (समिक्षक परिक्षक) यानी प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच संत नामदेव महाराज पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

॒संत नामदेव महाराज प्रतिष्ठान घुमान, संत नामदेव महाराज संस्थान अमृतसर (पंजाब) तसेच संत नामा साहित्य मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तर वी जयंती निमित्ताने जयंतीचे औचित्य साधुन संत नामदेव महाराज गाथ्यातील अभंग रस ग्रहणाची राष्ट्रीय स्तरावर लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संपूर्ण राज्यातील अकराशे पंच्याहत्तर अभ्यासक व संत साहित्यिक सहभागी झाले होते. या रसग्रहणात्मक लेखन स्पर्धेचा निकाल पंधरा ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला यामध्ये शेकापूर येथील व व्यंकटराव देशमुख विद्यालय बनशेळकी ता उदगीर जि लातूर येथील शिक्षक श्री किशन दत्तात्रय उगले शेकापूरकर (समिक्षक परिक्षक) यानी प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच संत नामदेव महाराज पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत
या राष्ट्रीय स्तरावरील रसग्रहणात्मक लेखन स्पर्धेत किशन दत्तात्रय उगले शेकापूरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल व संत नामदेव महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पंजाबचे महामहिम राज्यपाल मा श्री बनवारीलालजी पुरोहित यांच्या हस्ते अमृतसर (पंजाब) येथे संत नामदेव महाराज पुरस्कार वितरण करण्यात आले आहे रोख रक्कम सन्मान चिन्ह पंजाबी पगडी प्रमाणपत्र शाल देवुन यथोचित सत्कार सहा सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे किशन दत्तात्रय उगले यांनी संत नामदेव महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचे सर्व साहित्य स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे



