महाराष्ट्र

परीक्षेतील गैरप्रकारात : अजामीनपात्र गुन्हा

इयत्ता बारावीच्या परीक्षा मंगळवार पासून आणि दहावीच्या 22 तारखेला सुरू होत आहेत. या परीक्षेत गैरप्रकार करणारे विद्यार्थी त्यांना मदत करणारे शिक्षक, पालक, सहकारी यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

पुणे : राज्यात होत असलेल्या परीक्षा केंद्रावरील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रशासनाची करडी नजर राहणार असून या परीक्षा केंद्रांचे दैनंदिन चित्रीकरण त्याच दिवशी संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच परीक्षा काळात कोणत्याही शाळा, विद्यालयाचे शिक्षक अथवा कर्मचारी गैरप्रकार करताना आढळल्यास त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. त्याबरोबरच संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार आहे.
या संदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र बोर्डाच्या सचिवाने स्वतंत्र पत्रक काढले आहे त्यात त्यांनी परीक्षा केंद्र संचालक केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांनी परीक्षेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची सविस्तर माहिती दिली आहे शिवाय राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महसूल यंत्रणा परीक्षेच्या कामातील गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी मदत करणार आहेत.
याअंतर्गत
1.सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथक परीक्षा कालावधीत पूर्णवेळ तैनात राहणार आहे
2.महसूल, जिल्हा परिषदसह इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्त केली जाणार आहे.
3.यासोबतच भरारी पथके परीक्षा केंद्रांची तपासणी करणार आहेत.
4. संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेरा द्वारे लक्ष ठेवले जाणार आहे
5. परीक्षा केंद्रापासून पाचशे मीटर अंतरावर असणारे झेरॉक्स सेंटर परीक्षा काळात पूर्ण बंद असतील.
6. परीक्षा केंद्राबाहेरील कॉपी पुरवणाऱ्यावर आळा घालण्यासाठी त्या त्या जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था केली जाणार आहे.
7 महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रॅक्टिस ऍक्ट 1982 नुसार परीक्षेत गैरप्रकार करणारे गैरप्रकारास मदत करणारे यांच्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्याचे सक्त आदेश मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी दिले आहेत
आदेश 👇👇👇
copy_mukt_abhiyan_8a8bf13901

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/