स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : लिंगायतांना तिकीट देण्याची मागणी

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका निवडणूकीत लिंगायत समाजाच्या उमेदवारांना विविध राजकीय पक्षांनी जास्त उमेद्वारी द्यावी अशी मागणी लिंगायत महासंघाच्या लातूर येथे झालेल्या लिंगायत समाजाच्या बैठकीत करण्यात आली.
लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे झालेल्या बैठकीत आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेत लिंगायत समाजाची जिल्हाभरातील लोकसंख्या गृहीत धरून सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त लिंगायत उमेदवारांना तिकीट द्यावीत अशी बैठकीत मागणी करण्यात आली.
यावेळी उदगीर, अहमदपूर न.प.वर तर शंभर टक्के लिंगायताचा नगराध्यक्ष होईल अशी तयारी केली आहे. तर निलंगा न.प.वर लिंगायतांना संधी द्यावी अशी राजकीय नेत्यांना विनंती करण्यात येणार आहे. इच्छूकांना तिकीटे मिळावेत म्हणून राजकीय नेत्यांना व जिल्हा अध्यक्षांना शिष्टमंडळे भेटणार आहेत. या बैठकीला लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष करिबसवेश्वर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ भूरके, जिल्हा संघटक काशिनाथ मोरखंडे, जिल्हा कोषाध्यक्ष माणिकअप्पा मरळे, सहकोषाध्यक्ष शिवदास लोहारे, मार्गदर्शक गुंडू ब्रम्हवाले गुरूजी, प्रदेश सहसचिव विश्वनाथ मिटकरी, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत तोळमारे, लिंगायत महासंघाचे चाकूर कार्याध्यक्ष धिरज माकणे, लातूर तालुकाध्यक्ष भिमाशंकर ढेकणे, सोसायटी सदस्य स्वामी, विश्वनाथ भेटे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पटणे, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवकुमार होळदांडगे, भागवत पोपडे या प्रमुख मंडळीसह अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.



