रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पाथरी तालुकाध्यक्ष पदी महेश जोशी
परभणी…. रुग्ण हक्क संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष ॲड विजयभाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली व या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते महेश जोशी यांची पाथरी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

परभणी येथील झालेल्या जिल्ह्यातील विविध वैद्यकीय विषयांवर सोई सुविधा व वैद्यकीय क्षेत्रातील होत असलेली लुट व शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुंबई विभाग प्रमुख प्रशांत डोने यांनी सुचविलेले व रुग्ण हक्क संघर्ष समिती चे सदस्य अनेक सामाजिक संघटनाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते पत्रकार महेश जोशी यांचे सामाजिक क्षेत्रातील व वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णांसाठी त्यांची तळमळ व आत्मियता पाहून त्यांची रुग्ण हक्क संघर्ष समिती पाथरी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड विजय भाऊ पंडित सचिव विश्वास कुलकर्णी सहसचिव संतोष सोनवणे व मुंबई विभाग प्रमुख प्रशांत डोने प्रदेशाध्यक्ष संजय बावळेकर, संघटक किरण बदे, महिला प्रमुख मीनाक्षीताई शेटे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना मोरे सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले व रुग्ण हितार्थ पुढिल वाटचालीसाठी व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



