देश -विदेश

7 ते 9 मार्च 2025 दरम्यान गांधी विचार साहित्य संमेलन

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित

गांधी हा विचार नसून तो आचार बनला पाहिजे. गांधी हे भारतासकट शांतीचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रेरणास्त्रोत आहेत. म्हणून जागतिक राजकारणातील महान व्यक्ती गांधी विचाराला पर्याय नसल्याचे मान्य करतात. जगातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे गांधीवादात मिळतात म्हणून गांधीवादाला अनन्य साधारण असे महत्त्व आजही पाहायला मिळते. तीन दिवसीय संमेलनाच्या निमित्ताने

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, पुणे यांच्या वतीने दिनांक 7 ते 9 मार्च 2025 दरम्यान गांधी विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष सुरेश व्दादशीवार असून उद्घाटक म्हणून मनोज कुमार झा असणार आहेत. उद्घाट दिनांक 7 रोजी दुपारी वाजता होणार आहे तर समारोप दिनांक 9 रोजी सायंकाळी होणार असून कार्यक्रमात पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या अंतर्गत 7 मार्च रोजी सर्व धर्म प्रार्थना व उद्देशिकेचे वाचन केले जाणार आहे. उद्घाटक मनोज कुमार झा, स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख. प्रास्ताविक कुमार सप्तर्षी करतील. संमेलनाचे अध्यक्ष सुरेश व्दादशीवार आपले मनोगत व्यक्त करतील. दुसऱ्या सत्रात भारतीय संविधान का संगीतमय सफर विशेष चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपन्न होईल.
आठ मार्च रोजी गांधीजींची नई तालीम, गांधी आणि आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार, हिंदू मुस्लिम प्रश्न आणि गांधीजी, जात वर्ग आणि लिंग संघर्ष गांधीजींच्या दृष्टिकोनातून परिसंवाद, पुन्हा पुन्हा गांधी आणि गांधीजींच्या जीवनावरील मराठी, हिंदी, उर्दू कवितांचा कार्यक्रम होईल.
नऊ मार्चला मी आणि गांधीजी, दुसरे सत्रात गांधी वरील दोन कथांचे अभिवाचन, तिसऱ्या सत्रात माझा आतला आवाज या विषयावर व्याख्यान होणार आहेत.
चौथे सत्र समारोपाचे असेल. या तीन दिवसीय कार्यक्रमात मेधाताई पाटकर, अरुण फिरोदिया, चंद्रकांत जटाले, कॉम्रेड अजित अभ्यंकर, राम पुणीयानी, किशोर बेडकीहळ, डॉ कुमार सप्तर्षी, डॉ आनंदकुमार, हेरंब कुलकर्णी, सुषमा शर्मा यांची विशेष व्याख्याने होणार आहेत.
कार्यक्रम पत्रिका 👇👇👇👇

तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात नवयुवकांना आणि ज्यांना गांधी विचार समजून घ्यायला आवडेल त्यांनी या संमेलनात सहभागी होणे आवश्यक ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/