ज्ञानप्रकाश : मुलांवर संस्कार करणारे केंद्र! सुहास पाचपुते

ज्ञानप्रकाश संस्काराचे एक महत्त्वाचे केंद्र. राज्यातील आगळा वेगळा प्रकल्प. दिवाळी साजरी करतांना समाजभान जपण्यासाठीचे प्रयत्न. संचालक मा सतिश नरहरे आणि मुख्याध्यापिका मा. सविता नरहरे यांचे अभिनंदन.
ज्ञानप्रकाश प्रयोगशील, उपक्रमशील , शैक्षणिक व सामाजिक भावना जपणा-या प्रकल्पात विविध सण,उत्सव व उपक्रम होतात .शैक्षणिक सत्राची सुरुवात जशी मुलांच्या उत्साही स्वागताने होते तसाच उत्साह सत्राचा समारोप करताना असतो .
पहिल्या सत्रात अभ्यासासोबतच कला,क्रीडा,प्रार्थना सभा, कार्यशाळा,क्षेत्रभेट,शिकणं,समजून घेणं आणि अभ्यास,परीक्षा इत्यादी कामात मुलं मग्न होती . या शैक्षणिक सत्राचा समारोप म्हणजे प्रथम सत्र परीक्षेचा शेवटचा पेपर आणि आकाश कंदिलारोहण कार्यक्रम.. त्यानंतरच मुलांना दिवाळीची सुट्टी लागते .
काल ज्ञानप्रकाश लर्निंग होम मध्ये अतिशय उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात आकाश कंदिलारोहण कार्यक्रम मान्यवर पाहुणे मा.श्री.सुहास पाचपुते (चेअरमन,यशवंत सहकारी बँक,लातूर) यांच्या हस्ते झाला . यावेळी सतीश नरहरे (प्रकल्पप्रमुख,ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प), नरहरे क्लासेसचे माजी विद्यार्थी रविशंकर केंद्रे , अशोक गुरदाळे (पर्यवेक्षक), शिवशंकर राऊत (उपमुख्याध्यापक) व सिद्धांत नरहरे (माजी विद्यार्थी, ज्ञानप्रकाश) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्वागतपर मनोगत व्यक्त करताना प्रकल्पप्रमुख सतीश नरहरे यांनी त्यांच्या कार्याचा विशेष परिचय दिला.तसेच प्रकल्पाच्या वेगवेगळ्या विभागात आकाश कंदिलारोहण कसा होतो हे सांगितले .ज्ञानप्रकाशच्या शिक्षक व पालकांकडून वंचीत गटापर्यंत दरवर्षी फराळ पोचवला जातो . तसा यावर्षीही निलंगा येथील सामाजिक कार्य करणाऱ्या प्रकल्पास फराळ दिला जाणारा आहे अशी माहीती व त्यामागची भावना आणि भूमिका ही सांगितली. ज्ञानप्रकाशच्या दोन अंकांचे प्रकाशन यावेळी पाहुण्यांनी केले .
मुलांशी संवाद साधताना श्री पाचपुते म्हणाले , औसा येथील कार्यक्रम टाळून येथे आलो याचा मला खूप आनंद आहे. तुमच्यातील शिस्त,उत्साह, उर्मी आणि ऊर्जा अधिक शक्ती देऊन गेली .



प्रकल्पाचे कौतुक करताना मा.श्री.पाचपुते म्हणाले, मी स्वतः शिक्षक आहे.त्यामुळे मी अनेक शाळा पाहिल्या परंतु ज्ञानप्रकाश शाळा नव्हे तर प्रकल्प मुलांवर संस्कार करण्याचा सर्वात मोठे केंद्र आहे..
अशा शाळा निर्माण करताना प्रकल्पप्रमुख श्री.नरहरे सरांनी आपल्या सारखे संस्थाचालकही निर्माण करावेत..
प्रकल्पाचे विस्तीर्ण होणारे रूप पाहता श्री.पाचपुते सर म्हणाले, महाविद्यालयापेक्षा सुद्धा मोठे स्वरूप प्रकल्पास प्राप्त झाले आहे. हा प्रकल्प केवळ विद्यार्थी घडवत नाही तर,एक सक्षम नागरिक बनविण्याचे काम करत आहे. परत मुलांशी संवाद साधण्यासाठी येईल असे आश्वासन देऊन संवादाचा समारोप केला.
यावेळी सर्वांनी दिवाळी सुट्टीत वाढदिवस असणाऱ्या मुलांना शुभेच्छा दिल्या .
इ 9 वी तील कु.आर्या सुवर्णकार व इयत्ता 7 वीतील सर्वज्ञ नागुरे यांनी प्रार्थना घेतली.आकाश कंदिलारोहण कार्यक्रमावेळी ढाल,ताशा,सनई वादनात मुलंमुली नृत्य करून दिवाळी सुट्टी लागल्याचा आनंद व्यक्त केला.
शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यास कांचन वृक्षाचे रोपटे देऊन वृक्षारोपण करण्यास सुचविले.


