हवामान बदलाच्या फटक्याने 1300 जणांचा बळी

हवामान बदलाच्या परिणामांमुळे आलेल्या दित्वाह चक्रीवादळामुळे इंडोनेशिया, श्रीलंका, सुमात्रा, थायलंड, मलेशिया आणि भारतात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे १,3०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान बदलामुळे गरीब उष्णकटिबंधीय आणि कमी उत्पन्न असलेल्या प्रदेशांना, विशेषतः दक्षिण आशिया, उप-सहारा आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेच्या काही भागांना सर्वाधिक आर्थिक नुकसान सहन करावे लागते, अनेकदा उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ आणि वादळांमुळे दरवर्षी GDP मध्ये 5-18% घट होते. सर्वाधिक प्रभावित प्रदेश दक्षिण आशिया (उदा. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका): पूर, वादळ, वणव्या आणि पाण्याच्या कमतरतेमुळे 2050 पर्यंत 10-18% GDP ला धोका आहे, ज्यामध्ये कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये श्रीमंत देशांपेक्षा 3.6 पट जास्त नुकसान होत आहे.

नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने इंडोनेशियात सुमात्रासह पूर आणि भूस्खलनामुळे ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाले आहेत तर ५०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि अनेक जखमी आहेत. घरांचे आणि मुलभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विशेषतः उत्तर सुमात्रा आणि पश्चिम सुमात्रा प्रदेशात, हजारो लोक विस्थापित झाले आहेत. तर श्रीलंकेत: चक्रीवादळ दिटवा-प्रेरित मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सुमारे ४१० लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून किमान ३३६ लोक बेपत्ता आहेत. या भागातील जवळजवळ २३३,००० लोक विस्थापित झाले आहेत आणि ५०० हून अधिक घरे आणि सामुदायिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. थायलंडमधील स्थिती देखिल यापेक्षा वेगळी नसून दक्षिणेकडील प्रांतांत आलेल्या पुरामुळे किमान १४५ मृत्यू झाले आहेत, तर सुमारे ३.६ दशलक्ष लोक आणि १.२ दशलक्षाहून अधिक घरे यापूरामुळे प्रभावित झाली आहेत. एकट्या सोंगखला प्रांतात ११० जणांचा मृत्यू झाला, ज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि रहिवासी अडकले.
मलेशियातील परिस्थिती फारशी गंभीर नसली तरी पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये लक्षणीय रित्या स्थलांतरित व्हावे लागले आहे.भारताच्या दक्षिणेकडील राज्यात वादळाचा मोठा तडाखा बसला आहे.
हवामान बदलामुळे जागतिक पातळीवर अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. यापुढे देखिल घडत राहतील. याबाबतीत जागतिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नात प्रामाणिकपणा आणि गतीमानता येणे अपेक्षित आहे. करण वातावरण बदलाचा फटका केवळ एका क्षेत्राला बसत नसून पर्यावरणीय धोक्या बरोबर मानवी स्वास्थ्य शेती वन्य प्राणी यांना देखील बसत आहे. त्यामुळे विकसित देशांनी या बाबत पुढाकार घेऊन प्रयत्नांना बळकटी देणे आवश्यक आहे.
हवामान बदलासाठी कारणीभूत ठरणारी उत्पादने न वापरता व आपल्या परीने घरातील ऐसी आणि फ्रिज अनावश्यक असताना बंद ठेवून, प्लास्टिक उत्पादने वर्ज्य करुन यात योगदान देवू शकतो.



