तरुण प्रौढांमधील अचानक मृत्य आणि कोविड-१९ लस काय संबध आहे

नवी दिल्ली दिल्लीतील एम्स येथे अचानकपणे मृत्यू पावलेल्या तरुण प्रौढांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एका वर्षाच्या कालावधीत मृत्यू पावलेल्यांच्या शवविच्छेदन-आधारित निरीक्षण अभ्यासात तरुण प्रौढांमधील अचानक मृत्यूचा संबंध कोविड-१९ लसीकरणाशी असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. परिणामी कोविड लसींची सुरुक्षितता निश्चित होते.
हे निष्कर्ष कोविड-१९ लसींच्या सुरक्षिततेची आणि परिणामकारकतेची पुष्टी करणाऱ्या जागतिक वैज्ञानिक पुराव्यांशी सुसंगत आहेत. नवी दिल्लीतील एम्सचे प्राध्यापक डॉ. सुधीर अरवा यांनी असे प्रतिपादन केले की, कोविड-१९ लसीकरण आणि अचानक मृत्यू यांच्यातील संबंध सूचित करणारे दिशाभूल करणारे दावे आणि असत्यापित अहवालांच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासाचे प्रकाशन विशेष महत्त्वाचे आहे.

अलिकडच्या काळात तरुण प्रौढांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने ही एक महत्त्वाची चिंता बनली आहे. यासंदर्भात विशेष अभ्यास करण्याची आवश्यक्ता असून अशा मृत्यूमागे अंतर्निहित कोरोनरी धमनी रोग हे प्रमुख कारण आहे आणि श्वसन आणि अस्पष्ट मृत्यू संदर्भात पुढील तपासाची आवश्यकता असल्योच अभ्यासात म्हटले आहे..
“तरुण प्रौढांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यू संदर्भात भारतात एक वर्षाच्या कालावधीतील अभ्यासयाअंतर्गत करण्यात आला आहे.हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयजेएमआर) मध्ये प्रकाशित झाला आहे.
या संशोधनात तज्ञांच्या बहुविद्याशाखीय पथकाने केलेल्या मौखिक शवविच्छेदन, पोस्ट-मॉर्टम इमेजिंग, पारंपारिक शवविच्छेदन आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीद्वारे अचानक मृत्यूच्या प्रकरणांचे तपशीलवार मूल्यांकन समाविष्ट होते. अभ्यासात एका वर्षाच्या कालावधीत १८-४५ वयोगटातील प्रौढांमध्ये होणाऱ्या अचानक मृत्यूची तपासणी करण्यात आली. तरुण लोकसंख्येमध्ये कोविड-१९ लसीकरण स्थिती आणि अचानक मृत्यू यांच्यात सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण संबंध आढळला नाही, असे अभ्यासात म्हटले आहे.
तरुणांमध्ये मृत्यूचे सर्वात सामान्य कारण हृदय व रक्तवाहिन्याशी प्रणालीशी संबंधित कारणे होती, त्यानंतर श्वसनाशी संबंधित कारणे आणि इतर गैर-हृदयरोगाचे आजार असल्याचे म्हटले आहे.
तरुण आणि वृद्ध वयोगटातील लोकांमध्ये कोविड-१९ आजाराचा इतिहास आणि लसीकरणाची स्थिती तुलनात्मक असल्याचे आढळून आले, कोणताही कारणात्मक संबंध ओळखला गेला नाही.



