महाराष्ट्र

महापालिकांचा रणसंग्राम सर्वच राजकीय पक्षात घुमशान

महापालिकांचा रणसंग्राम सुरु होण्यापूर्वीच उमेद्वारीच्या आयात निर्यातीवरुन जवळपास सर्वच राजकीय पक्षात घुमशान सुरु आहे. त्यातच पुन्हा निष्ठावान आणि पॅराशूट व बाहेरच्या लादलेल्या उमद्वारीवरुन देखिल मोठा नारजीचा सुर जवळपास सर्वच महापलिका क्षेत्रात होत असलेल्या निवडणूकात दिसून येते आहे.

लातूर महापालिका निवडणूक देखिल त्याला आपवाद राहीली नाही.येथे देखिल आयातीत उमेद्वारीवरुन मोठ्या प्रमाणात नारजी वाढलेली असतांनाच उमेद्वारीसाठी घेतलेल्या मोठ्या रकमांची आणि गढीच्या धोरणाशी सुसंगम असणाऱ्यांना उमेद्वारी बहाल केल्याने लातूर महापालिका निवडूणक प्रमुख आणि प्रभारी गोत्यात आले आहेत. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळीच ज्यांच्याकडून मनपा निवडणूक प्रमुख पद काढून घेण्यात आले त्यांना भेटण्यासाठी विद्यमान आमदांनी भेट घेवून लातूर मध्ये होवू घातलेल्या नव्या प्रयोयागाला थांबवण्याची विंनती . काल लातूरमधिल भाजपाच्या जून्या निष्ठावान गटाने बैठक घेतली आणि लातूर मधील मनपा निवडणूकीत एकदंरीत 40 पेक्षा जास्त् इच्छूकांना उमेद्वारी देत आयात,नातेवाईक,मर्जीतील व बाहेरच्या उमद्वाराच्या विरोधात मोदी तूझसे बैर नही,गद्दार तेरी खैर नहीचा नारा देत तगडे आव्हान उेभे करण्याचा प्रयत्न केला जात असून या सर्वांनी एकाच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे देखिल जाहिर केल्याने प्रभारींनी लगेचच कॉलींग सुरु करत आणि वरीष्ठांच्या माध्यमातून सुत्रे फिरवण्याचा सपाटा लावला आहे. ही बाब अंतर्गत असल्याने अद्याप धमक्या पर्यंत गेली नाही.
याची सुरुवात झाली ती अर्चनाताई यांचे निवडणूक प्रमुखपद काढून घेण्याने.भाजपाच्या कांही वरीष्ठांनी कांही निर्णय नगरपालिका निवडूकीपूर्वी आणि कांही नंतर घेतले त्याचा परिणाम पूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे चांगले परिणाम दिसून आणि अडचणीची ठरणारी ताई बाजूला सारू अर्थपूर्ण व्यवहाराच्या माध्यमातून कशा उमेद्वारी बहाल करण्यात आल्या याच्या सुरस कथा लातूरमध्ये ऐकण्यास मिळत आहेत.एकाच वेळी अनेक राजकीय पक्षात अशी निष्ठावतांची वाटमारी सुरु असून कॉग्रेंस आणि राष्ट्रवादीत देखिल असेच चित्र आहे.
सर्वच् राजकीय पक्षात वाद वाढण्याचे महत्वाचे मुख्य कारण म्हणजे उमेद्वारी देतांना प्रथम आपले नातेवाईक,अर्थपूर्ण व्यवहार करणारे,इतर प्रभागातील उमेद्वार आणि आपल्या राजकीय सोयीसाठी आणि उच्च पातळीवरच्या राजकीय हितसंबधासाठी पूरक ठरतील आणि पक्षाचे काहीका होईना या धर्तीवर ज्या उमेद्वाऱ्या बहाल केल्या त्यावरुन मोठा वाद वाढला आहे. याचा परिणाम निष्ठावान कार्यकत्यांना अन्य कोणताच मार्ग नसल्याने आणि कोणी जबाबदार या विषयी ब्र काढत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे कालच जाहिर केले असून आता माघार नाही ही भूमीका घेतली गेली आहे.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे मनपा निवडणूक प्रमुख काढून घेतल्याने विधानसभेला ज्यांनी गद्दारी केली ते सर्वच एकत्रीतपणे मनपा निवडणूकीचा कारभार पाहत आहेत.लातूर जिल्ह्यातील आमदारांनी एकमेंकाना पूरक ठरणारे राजकीय समीकरण जुळवूण ही निवडणूक संगनमताने करण्याचा प्रयत्न केल्याचे लातूरकरांचे म्हणने आहे. काल भाजपाच्या निष्ठावानांचा झालेला मेळाव्याला जितेश चापसी, नितीन शेटे,माधव पाटील महाळंग्रीकर,ॲड दिपक कुलकर्णी,कुलदीप सिंह ठाकूर, वामन राठोड यांच्यासह अंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मनपा निवडूक ही काटे की टक्कर होणार आता शंका नाही.कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील निष्ठावानांनी देखिल उमद्वारी अर्ज दाखल केला असून लातूरकरांना कांही प्रभागात चौरंगी लढतीची अपेक्षा आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांचे नेहमीच आपसातील सहकार्य हा लातूरच्या राजकारणातील पॅटर्न या मनपा निवडणूकीत देखिल दिसून येत असून आपल्या राज्यस्तरीय नेतृत्वाची ? पत पणाला न लावता खेळीमेळीच्या राजकीय सोपस्कारात भरडला जातोय तो सर्वच पक्षातील निष्ठावान कार्यकर्ता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/