लातूर जिल्हा

राजाराम साबळे व विलास आल्टे भीम योद्धा पुरस्काराने सन्मानित

20 मार्च 1927 रोजी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः स्थापित केलेले आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद. डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतात मोठ्या जोमाने कार्यरत आहे. पण लातूर जिल्ह्यामध्ये समता सैनिक दलाची पोकळी भरून काढण्यासाठी भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर गेल्या 25 वर्षापासून सतत प्रयत्न करून आज लातूर जिल्ह्यामध्ये 500 समता सैनिकाची फौज ज्यांच्या प्रयत्नातून निर्माण झाली आहे. असे असिस्टंट लेफ्टनंट जनरल म्हणून समता सैनिक दलाच्या केंद्रीय स्तरावर कार्यरत असणारे राजाराम दादाराव साबळे व गेल्या 20 वर्षापासून समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत धडपड करणारे डिव्हिजन ऑफिसर म्हणून विभागीय पातळीवर कार्यरत असणारे विलास निवृत्तीराव आल्टे यांच्या कार्याची दखल घेऊन बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड च्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन व प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून *भीम योद्धा 2026* या पुरस्काराने दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर, नांदेड येथे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो, सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगरचे कार्यकारी अभियंता इंजि. अशोकराव येरेकर, भारतीय बौद्ध महासभा राज्य शाखा हिशोब तपासणी युवराज मोरे, समता सैनिक दल मेजर जनरल सुरेश गजभारे, ट्रस्टचे अध्यक्ष बौद्धाचार्य रमेश कोकरे, उपाध्यक्ष तथा नगरसेवक रावसाहेब गायकवाड, सचिव राजेश बिऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. भीम योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक प्रा. बापूसाहेब गायकवाड, राज्य संघटक डी.एस. नरसिंगे महिला जिल्हाध्यक्ष शारदाताई हजारे, जिल्हा सरचिटणीस अभिमन्यू लामतुरे, कोषाध्यक्ष अर्जुन कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, राजाभाऊ उबाळे, अजय गायकवाड अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/