लातूर जिल्हा

खातेधारक महिलांचा वृक्ष देऊन सन्मान

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त आर्थिक बचतीबरोबरच आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश देत वृक्षारोपण जोपासण्याचा संदेश आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नाईक चौक शाखेत देण्यात आला

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र ग्रामीण बँक, लातूर वसंतराव नाईक चौक शाखा यांच्या वतीने आज खातेधारक महिलांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला या शाखेमार्फत नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात याप्रसंगी शाखाप्रमुख श्री राजीव गांजरे यांनी महिलांसाठी बँकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना सह वेगवेगळ्या कर्ज योजना, बचत योजना यांची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सह व्यवस्थापक श्रीमती रुचिरा वझूरकर, कार्यालयीन सहाय्यक अनुराधा बनसोडे, विष्णू बोरगडे यांच्या हस्ते वृक्ष वितरण करण्यात आले.
अनुपमा देसाई शर्मिष्ठा हातागळे ललिता मुगळे कौशल्य देसाई शिवकन्या निलंगेकर वैशाली कोळपे या महिला खातेधारकांना वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/